म्हसळा नगर पंचायत नगराध्यक्षपदी फरीन अजीज बशारत तर उपनगराध्यक्ष पदी अनिकेत पानसरे
म्हसळा प्रतिनिधी:संतोष उध्दरकर.
म्हसळा: म्हसळा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची अधिकृत घोषणा आज करण्यात आली.त्यामध्ये नगराध्यक्ष पदी नगरसेविका
फरीन अ.अजीज बशारत तर उपनगराध्यक्ष पदी अनिकेत पानसरे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची अधिकृत घोषणा उपविभागीय अधिकारी महेश पाटिल यांनी केली.
म्हसळा नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असून आपल्या अन्य सहकारी सदस्यांना लोकप्रतिनिधित्व मिळावे यासाठी नगराध्यक्ष संजय कर्णिक,उपनगराध्यक्ष संजय दिवेकर यांनी त्यांचे पदाचा राजीनामा दिले असता रिक्त जागांवर पार पडणाऱ्या निवडणुकीत दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांच्या आदेशाने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेविका फरीन अ.अजीज बशारत आणि उपनगराध्य पदासाठी नगरसेवक अनिकेत पानसरे यांना संधी देण्यात आली आहे. याप्रसंगी, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, शहर अध्यक्ष रियाज घराडे,मावळते नगराध्यक्ष संजय कर्णिक,माजी उनगराध्यक्ष संजय दिवेकर,माजी नगराध्यक्ष असहल कादीरी,माजी नगराध्यक्षा जयश्री कापरे,नगरसेविका सरोज म्हशिलकर,माजी उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे,नगरसेवक नासीर मिठागरे,शाहीद जंजीरकर,सलीम बागकर,अजीज बशारत,नौसिन दळवी, वृशाली घोसाळकर,समेळसर, सौरभ पोतदार, दादा पानसरे, सुनील उमरोठकर,आदी मान्यवर उपस्थित होते.