चलो आझाद मैदान.. पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांची बैठक

26

चलो आझाद मैदान.. पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांची बैठक

जुनी पेन्शन योजना लागु करा….जनार्दन काळे

म्हसळा प्रतिनिधी: संतोष उद्धरकर.

म्हसळा: पदवीधर अंशकालीन शासनाच्या आदेशानुसार २००५ पूर्वी सतत तीन वर्षे जि.प. शाळा, तलाठी, तसेच इतर शासकीय सेवेत सेवा दिली असुन शासनाने दिलेल्या १० % आरक्षणातून अनेक अंशकालिन कर्मचारी हे शासन सेवेत लागले असले तरी तिन वर्षे अगोदर तुटपुंज्या मानधनात सेवा केली आहे. तरी अंशकालीन कर्मचारी यांचे सेवा निवृत्ती वय वाढ करणे, पदवीधर/ पदवीधारक अंशकालीन कर्मचारी बांधव हे सर्व २००५ पूर्वीचे असल्याने त्यांना मागील सेवा काळ विचारात घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करणे या विषयावर पदविधर अंशकालीन शासकीय कर्मचारी कल्याणकारी संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई या संघटने मार्फत माहे मार्च २०२५, मे २०२५, जुलै २०२५ असे तीन वेळा निवेदन शासनाला दिलेले असून सुद्धा शासनाचा ठोस निर्णय दिसून आला नसल्याने व शासन दरबारी या तिनही निवेदनाची दखल न घेतल्याने दि. १४ सप्टेबर २०२५ रोजी रविवार आझाद मैदान, पत्रकार भवन मुंबई ईथे बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सर्व परवीधर अंशकालीन कर्मचारी यांनी या बैठकीत उपस्थित राहण्याचे संघटेने कडुन आवहान करण्यात आले आहे.

———————————–
शासनाला तिन वेळा निवेदन देऊन सुद्धा मागण्या मान्य केलेल्या नाहीत, शासनाचा ठोस निर्णय दिसून येत नसल्याने वरील विषयावर बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येईल, या बैठकीला सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांनी उपस्थित रहावे असे मी आवाहन करतो.
जनार्दन काळे.
संघटना राज्य अध्यक्ष.