महाराष्ट्र बंद: सावनेर मध्ये बंदला उत्कृष्ट प्रतिसाद.
अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी.
मो.नं- 9822724136
सावनेर,दि.11 ऑक्टोंबर:- उत्तर प्रदेशातील लखिंमपुर येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकासआघाडी सरकार मधील राष्ट्रवादी काँग्रेस ने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याला महाविकास आघाडीतील शिवसेना,काँग्रेसने व इतर सामाजिक संस्था त्यांनी सुद्धा सहमती दर्शवली आहे.या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून आज दि. 11 ऑक्टोंबरला हा बंद पुकारण्यात आला.
तसेच आज नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे महाविकास आघाडीतर्फे मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्या सरकारच्या विरोधात दुकाने, प्रतिष्ठान बंद करण्यात आले. तसेच बॅनर झलकवत शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी नारेबाजी करत निषेध करीत महाराष्ट्र बदला समर्थन केले.
या मोर्चामध्ये उपस्थितामध्ये महाविकास आघाडीचे माजी जि.प.उपाध्यक्ष काँग्रेस मनोहर कुंभारे, पंचायत समिती सभापती कल्पना शिंदे, गोविंदा ठाकरे रामभाऊ उमाटे, मनोज बसवर, गोपाल घटे, पवन जयस्वाल, मनोज बघारे, अविनाश उर्फ पप्पू झाडे माजी सावनेर तालुका प्रमुख शिवसेना उत्तम कापसे, शहराध्यक्ष सुभाष मछले, कामगार सेल जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सुधाकर तीबोले, राजू खांडे, सुरेंद्र वानखेडे, रोशन वानखेडे, चंदूभाऊ पुरे, देवराव बनसोड, संजय जव्हार, राजू वाघाडे जनकल्याण सामाजिक संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष भगवानजी चांदेकर, मदन मोरे, शांताराम ढोके, अनिल अडकिने व चंदूभाऊ चौरे इत्यादी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.