अतिशय प्रतिष्ठेच्या मानला जाणारा हा अवॉर्ड विज्ञान, साहित्य क्षेत्रामध्ये संशोधन करणारे वैज्ञानिक आणि शांतीचा संदेश देणाऱ्या समाजसुधारक याना दिला जातो. १८७५ पासून आजवर चार भारतीयांनी नोबेल पारितोषिक मिळवले आहे.
सिद्धांत
मुंबई दि. ११ ऑक्टोबर २०२१: नोबेल पारितोषिक २०२१ जाहीर करण्याची प्रक्रिया ऑक्टोबरच्या ६ तारीखेपासून सुरु झाली होती, ११ ऑक्टोबरला अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारासह तिचा शेवट झाला आहे. स्वीडन या देशातून सर आल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने १८७५ सालापासून नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली होती. अतिशय प्रतिष्ठेच्या मानला जाणारा हा अवॉर्ड विज्ञान, साहित्य क्षेत्रामध्ये संशोधन करणारे वैज्ञानिक आणि शांतीचा संदेश देणाऱ्या समाजसुधारक याना दिला जातो.
नोबेल पारितोषिक २०२१ विजेते
भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक स्युकुरो मनाबे (Syukuro Manabe), क्लाऊस हॅसलमन (Klaus Hassselmann) यांना जाहीर झाले. ह्या दोन वैज्ञानिकांनी पृथ्वीवरील ग्लोबल वॉर्मिंग संदर्भातील तंत्रज्ञानावर संशोधन केले होते.
तसेच जियोर्जियो पारिसी (Giorgio Parisi) यांना सुद्धा भौतिक शास्त्रातील संशोधनासाठी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.
रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक बेंजामिन लिस्ट आणि डेविड मॅकमिलन (for the development of asymmetric organocatalysis”) यांना बहाल करण्यात आले.
मेडिसिन क्षेत्रातील नोबेल पारितोषिक डेविड ज्युलियस आणि आर्डेम पेटापाउटियन या दोन अमेरिकन संशोधकांना देण्यात आले. शरीराला कोणत्याही गोष्टीचा स्पर्श झाल्यावर नक्की काय होत? कश्यामुळे आपल्याला तो स्पर्श कळतो? यागोष्टीबद्दल त्यांनी शोध लावला आहे.
अब्दुल रझाक गुरनाह यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळवले आहे. आखाती देशातील निर्वासित लोकांचे प्रश्न त्यांनी रोखठोकपणे आपल्या लिखाणातून मांडले होते.
२०२१ चे शांततेचे नोबेल पारितोषिक फिलीपाइन्सनमधील मारिया रेस्सा (Maria Ressa) आणि रशियातील दिमित्री मुरातोव्ह (Dmitry Muratov) या दोन पत्रकारांना बहाल करण्यात आले.
आज दुपारी डेविड कार्ड, जोशुआ अँग्रिस्ट आणि गुइडो गुइडो इम्बेन्स अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले.
नोबेल पुरस्काराचे स्वरूप
नोबेल पुरस्कार प्रमाणपत्र, पदक आणि १ मिलियन डॉलर्स असे ह्या नोबेल पुरस्काराचे स्वरूप असते. गेल्याच वर्षी या पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्यात आली होती. येत्या ६ डिसेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमात विजेत्यांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात येतील. त्यादरम्यान ओस्लो आणि स्टोकहोल्म या शहरांत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
नोबेल पारितोषिक विजेते भारतीय.
१८७५ पासून आजवर चार भारतीयांनी नोबेल पारितोषिक जिंकले आहे. १९१३ साली रवींद्रनाथ टागोर यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी १०३० साली सी.व्ही. रामन यांना नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आला होता. १९९८ साली अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील आणि २०१४ साली कैलास सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.