पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाँच केली, इंडियन स्पेस असोसिएशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडियन असोसिएशन स्थापनेची घोषणा केली. ह्या असोसिएशन द्वारे खासगी कंपन्यांना अवकाश तंत्रज्ञानामध्ये प्रगती करण्याची दारे खुली करण्यात आली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाँच केली, इंडियन स्पेस असोसिएशन

सिद्धांत

मुंबई दि. ११ ऑक्टोबर २०२१: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडियन स्पेस असोसिएशन स्थापनेची घोषणा केली. ह्या असोसिएशन द्वारे खासगी कंपन्यांना अवकाश तंत्रज्ञानामध्ये प्रगती करण्याची दारे खुली करण्यात आली असून, ह्यामध्ये इस्रो सहकार्य करेल. जगामध्ये अवकाश युग सुरु झाले असून त्यामध्ये भारताला मागे राहून चालणार नाही.

अवकाश तंत्रज्ञानातील विकास हा भारतातील १३० कोटी जनतेच्या फायद्यासाठीच असून आम्ही जाहीर केलेल्या पॉलिसी ह्या विकासाला चालना देतील. आधुनिक अवकाश तंत्रज्ञानामुळे आपण हवामानाचा अचूक अंदाज लावू शकतो, जो देशातील शेतकरी, मच्छीमार यांच्यासाठी फायद्याचा ठरेल. पर्यावरणाच्या ह्रासाच्या कारणांचा अचूक शोध लावून त्यावर योग्य उपाययोजना करता येतील असेही पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले.

काय आहे इंडियन स्पेस असोसिएशन?
इंडियन स्पेस असोसिएशन हि खासगी कंपन्यांची संस्था आहे. ह्यामध्ये वनवेब, भारती एअरटेल, मॅपमायइंडिया,वॉलचंदनगर इंडस्ट्री,अनंत टेक्नॉलॉजी ह्यासारख्या कंपन्यांच्या समावेश आहे. अवकाश क्षेत्रामध्ये नवीन तंत्राद्यानचा विकास करण्यासाठी ह्या कंपन्यांनी भारत सरकारशी विविध करार केले आहेत. ह्यामध्ये इस्रो सुद्धा सहाय्यकाची भूमिका पार पडणार आहे.

Skyroot Aerospace: ह्या भारतीय स्टार्टअप कंपनीने रॉकेट लाँच क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारतीय सरकारसोबत करार केला आहे

Nelco from Tata Group: टाटा ग्रुपची हि कंपनीत सॅटेलाईट कॉम्युनिकेशनचे तंत्रज्ञान विकसित करण्यावर संशोधन करणार आहे.

Map My India: मॅप माय इंडिया ह्या कंपनीने इस्रो सोबत करार करून भारताच्या प्रत्येक भागाचा अचूक नकाशा तयार करण्यासाठी ४डी मॅपिंग सिस्टिम तयार करण्याचे काम करणार आहे.

Astrome Technology: हि कंपनी भारताच्या दुर्गम भागात स्वस्त आणि जलद इंटरनेट सुविधा पुरवण्याचे तंत्रज्ञान विकसित करणार आहे.

Airtel One Web: हि कंपनी येत्या काही दिवसात इस्रोच्या मदतीने ३६ नवीन सॅटेलाईट अंतराळात सोडणार आहे. त्याच्या आधारे भारतातील मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेट सुविधा अधिक जलद करण्यावर त्यांचा भर असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here