सोने लुटणारा आरोपी पोलिसांच्या अटकेत • बँकेचा कर्मचारी असल्याची बतावणी करून करायचा लुटमार

46
सोने लुटणारा आरोपी पोलिसांच्या अटकेत • बँकेचा कर्मचारी असल्याची बतावणी करून करायचा लुटमार

सोने लुटणारा आरोपी पोलिसांच्या अटकेत

• बँकेचा कर्मचारी असल्याची बतावणी करून करायचा लुटमार

सोने लुटणारा आरोपी पोलिसांच्या अटकेत • बँकेचा कर्मचारी असल्याची बतावणी करून करायचा लुटमार

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर : 11 ऑक्टोबर
बँकेचा कर्मचारी असल्याची बतावणी करीत राज्यातील विविध भागात सोन्याचे दागिणे लुटणार्‍या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. रामराव भिमराव ढोबळे (51, रा. तीवसा, जि. अमरावती) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
वरोडा तालुक्यातील येन्सा येथील मंजुळा नथ्थुजी झाडे (65) ही वृध्दा 9 ऑक्टोबर रोजी आपल्या घरी असताना दोन अनोळखी व्यक्ती तेथे आले. बँकेचे अधिकारी असल्याची बतावणी करीत तुम्हाला पंतप्रधान किसान योजनेमार्फत 1 लाख 40 हजार रुपये व बैलगाडीसाठी 3 लाख रुपये मंजुर झाल्याचे त्यांनी त्या महिलेला सांगितले. त्यासाठी तुम्हाला अगोदर 22 हजार रुपये नगदी भरावे लागतील असे सांगत त्या वृध्द महिलेकडील सोन्याची पोत व कानातील बिर्‍या असा एकूण 38 हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे सोबत घेऊन आरोपी पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या वृध्देने याबाबतची तक्रार वरोडा पोलिस ठाण्यात दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याच दिवशी दुपारच्या सुमारास अशाच प्रकारचा गुन्हा वरोडा तालुक्यातील भटाळी येथे घडला. याबाबतची तक्रार शेगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी रामराव भिमराव ढोबळे (51, रा. तीवसा, जि. अमरावती) यास सावनेर तालुक्यातील केळवड येथून ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने हे दोन्ही गुन्हे आपल्या सहकार्‍याच्या मदतीने केल्याची कबुल दिली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली होन्डा शाईन दुचाकी जप्त करण्यात आली. या आरोपीवर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधिक्षक रीना जनबंधु यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, पोलिस उप निरीक्षक विनोद भुरले, हवालदार धनराज करकाडे, नापोशि चंदु नागरे, प्रशांत नागोसे, दिनेश आराळे तसेच सायबर पोलिस ठाण्याच्या सहकायाने करण्यात आली. आरोपीला पुढिल तपासकरिता वरोडा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.