पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील योजना घरोघरी पोचविण्याचा निर्धार - सौ. वंदनाताई राजेंद्र गोंदकर

पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील योजना घरोघरी पोचविण्याचा निर्धार – सौ. वंदनाताई राजेंद्र गोंदकर

पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील योजना घरोघरी पोचविण्याचा निर्धार - सौ. वंदनाताई राजेंद्र गोंदकर

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी

आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी सत्तेत आल्यापासुन अनेक जनहिताच्या लोककल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. त्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे प्रतिपादन शिर्डी नगरपंचायत च्या माजी नगरसेविका सौ. वंदनाताई गोंदकर यांनी केले आहे.
भाजपा महिला मोर्चा च्या वतीने शिर्डी शहरातील आदर्श शाळा या ठिकाणी मोफत कर्क रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास प्रमुख उपस्थिती म्हणुन राहता तहसील चे आरोग्य अधिकारी श्री.डॉ. संजय घोलप साहेब व राहता ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. शुभांगी कांन्हे मॅडम होत्या. या वेळी डॉ. घोलप साहेबांनी आयुष्यमान भारत , प्रधानमंत्री मातृवंदना योजना यांसह अनेक जनहिताच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती उपस्थित शिबिरातील महिलांना दिली. तसेच या शिबिरास महिलांची लक्षणीय उपस्थित संख्या पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

या प्रसंगी श्री. साई बाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री.अशोक काका गोंदकर, भाजपा शिर्डी लोकसभा निवडणुक प्रमुख राजेंद्र गोंदकर, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री. किरण बोराडे, सौ.ललिता जाधव मॅडम ,सौ. सुवर्णा गुरव यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here