रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठरली संस्थांचे संगणकीकरण करणारी देशातील पहिली जिल्हा मध्यवर्ती बँक!
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: – ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे कामकाज गतिमान व पारदर्शक व्हावे,यासाठी देश पातळीवर संस्थांचे संगणकीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मोठ्या उत्साहाने संस्थाचे संगणकीकरणाचे काम सक्षमपणे पुर्ण केले. हे उपक्रम राबविणारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशातील एकमेव बँक ठरली असून जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली कामगिरी खऱ्या अर्थाने कौतूकास्पद आहे, असे गौरवोद्गार नाबार्डचे चेअरमन शाजी के.व्ही यांनी काढले. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा संगणकीकरण कार्यपूर्ती सोहळा शुक्रवारी(दि.11) अलिबागमध्ये आयोजित करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन जयंत पाटील, उपाध्यक्ष सुरेश खैरे, राज्य सहकार निवडणूक आयुक्त अनिल कवडे, नाबार्डचे सीजीएम संजयकुमार गुप्ता, सीजीएम रश्मी दराड, लेखापरिक्षण विभागाचे अपर निबंधक राजेश जाधवर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार किशोर दराडे, माजी आमदार दत्तात्रेय सावंत, नाबार्डचे जनरल मॅनेजर प्रदिप पराते, जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप, जिल्हा विशेष लेखा परिक्षक यु. जी. तुपे, प्रदिप अपसुंदे, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, संस्थाचे ज्येष्ठ पदाधिकारी शंकरराव म्हात्रे, ठाणे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणकुमार गोंधळी, आदर्श नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील, कमळ नागरी सहकारी पतंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपूळे, कामरान शेख, इमरान अन्सारी, बँकेच सर्व संचालक, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, महिला वर्ग व बँकेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदीप जगे तर आभार बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी शाजी के. व्ही यांनी सांगितले, विविध कार्यकारी संस्थाचे कामकाज पारदर्शक करण्यासाठी संगणकीकरणाचा उपक्रम हाती घेतला. संगणकीकरणामुळे कामकाजात अमुलाग्र बदल होऊन ते कामकाज अधिक गतीमान होण्यास मदत राहणार आहे. राज्यासह देशातील सर्व संस्थांचे एकत्रीकरण करण्याचा उद्देश समोर ठेवून काम केले आहे. खेड्यापाड्यात वेगवेगळे उपक्रम राबवून गावे आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. गावातील प्रगती अधिक गतीमान व्हावी या अपेक्षेतून हा उपक्रम राबविण्यात आला. रायगड जिल्हा बँकेने खुप चांगल्या पध्दतीने या उपक्रमात सहभाग घेऊन संस्था संगणकीकरण करण्यामध्ये बहूमान मिळाला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतील चेअरमन, संचालक, कर्मचारी यांचे सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यात आणखी वेगळ्या पध्दतीने उपक्रम राबविण्याचा प्रयत्न राहणार आहे. ग्रामीण भागातील 30 टक्के मंडळी शहरात व 70 टक्के मंडळी गावांमध्ये राहत आहेत. या गावांतील जनतेला उत्पन्नाचे साधन खुले व्हावे यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम सुरु केले जाणार आङेत. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मालाला चांगला भाव मिळावा. शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे, असे शाजी म्हणाले.
––—–