हुकूमशाही खपवून घेणार नाही माजी आ. पंडित पाटील यांचे प्रतिपादन

हुकूमशाही खपवून घेणार नाही
माजी आ. पंडित पाटील यांचे प्रतिपादन

हुकूमशाही खपवून घेणार नाही माजी आ. पंडित पाटील यांचे प्रतिपादन
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- समाजसेवक म्हणून काम करणारे खरसांबळे यांच्यावर हल्ला करणे ही बाब निंदनीय आहे. मारेकऱ्यांसह मुख्यसुत्रधार यांना वेळीच पोलिसांनी आवरणे आवश्यक आहे. ही दडपशाही व हूकूमशाही खपवून घेणार नाही. राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी या घटनेबाबत गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे माजी आ. पंडित पाटील म्हणाले.
यावेळी ते म्हणाले, हेमंत खरसांबळे एक चांगला राजकीय, व सामाजिक कार्यकर्ता आहे. समाजसेवक म्हणून देखील त्यांचे काम मोलाचे आहे. तरीदेखील त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. खरसांबळे यांच्यावरील झालेला हल्ला निंदनीय आहे. त्यांच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली जाणार आहे. खरसांबळे यांच्यावर यापुर्वीदेखील हल्ला झाला होता. त्यांच्यावरील हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. पोलीस अधीक्षक या घटनेकडे दुर्लक्ष का करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खरसांबळे यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. पोलीस अधीक्षकांनी या घटनेच्या मुळाशी जाऊन यातील खरा सुत्रधार कोण आहे, हे शोधून काढावे. अशी मागणी माजी. आ. पंडीत पाटील यांनी केली आहे.

चौकट
रुग्णालयाच्या अस्वच्छतेबाबत आक्रमक
अलिबागमधील जिल्हा रुग्णालायातील स्वच्छतेचा ठेका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गावातील ठेकेदाराला देण्यात आले आहे. तरीदेखील रुग्णालयातील स्वच्छता वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसून आले. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडण्याची भिती आहे. विद्यमान आमदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत. रुग्णातील अस्वच्छतेबाबत आक्रमक पावित्रा घेत स्वच्छता चांगली ठेवा, अशी सुचना माजी आ. पंडित पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाला दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here