अलिबाग येथे बँकेचे संगणकीकरण कार्यपूर्ती सोहळा

70
अलिबाग येथे बँकेचे संगणकीकरण कार्यपूर्ती सोहळा

अलिबाग येथे बँकेचे संगणकीकरण कार्यपूर्ती सोहळा

देशातील पहिला आणि ऐतिहासिक उपक्रम

अलिबाग येथे बँकेचे संगणकीकरण कार्यपूर्ती सोहळा

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुढाकाराने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा संगणकीकरण कार्यपूर्ती सोहळा शुक्रवारी (दि. 11) सकाळी दहा वाजता अलिबाग मधील बँकेच्या केंद्र कार्यालयात होणार आहे. देशातील पहिला आणि ऐतिहासिक उपक्रमाचा सोहळा बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील, नाबार्डचे चेअरमन शाजी के. व्ही. यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
यावेळी नाबार्ड केंद्र कार्यालय मुंबई येथील डी एमडी गोवर्धनसिंह रावत, सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे, राज्य सहकारी निवडणूक आयुक्त अनिल कवडे, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, नाबार्डच्या सीजीएम रश्मी दराड ,संजय कुमार गुप्ता सुब्रत कुमार नंदा, माजी सहकार आयुक्त शैलेश कोथमीरे, अप्पर निबंधक लेखापरीक्षण राजेश जाधवर ,अप्पर आयुक्त आणि विशेष निबंधक श्रीकृष्ण वाडेकर, विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव, तुषार काकडे, जिल्हा निबंधक प्रमोद जगताप, नाबार्डचे डी डी एम प्रदीप अपसूदे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक यु. जी. तुपे आदी मान्यवर, संचालक उपस्थित राहणार असल्याची माहिती रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी दिली.