ज्येष्ठ नागरिक संस्था कामार्ले- वाघोली च्या नुतन वास्तुचे लोकार्पण आ. महेंद्र दळवी यांच्या हस्ते संपन्न

111
ज्येष्ठ नागरिक संस्था कामार्ले- वाघोली च्या नुतन वास्तुचे लोकार्पण आ. महेंद्र दळवी यांच्या हस्ते संपन्न

ज्येष्ठ नागरिक संस्था कामार्ले- वाघोली च्या नुतन वास्तुचे लोकार्पण आ. महेंद्र दळवी यांच्या हस्ते संपन्न

आ.महेंद्र दळवी वास्तुसाठी सहा लाखांची मदत व स्टीलचे ५ बेंच भेट

ज्येष्ठ नागरिक संस्था कामार्ले- वाघोली च्या नुतन वास्तुचे लोकार्पण आ. महेंद्र दळवी यांच्या हस्ते संपन्न

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संस्था कामार्ले विभाग वाघोली येथे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते नुतन वास्तुचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आ.महेंद्र दळवी मार्गदर्शन करताना म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. आज ज्येष्ठ नागरिकांकरीता कामार्ले वाघोली येथे नुतन वास्तुचे लोकार्पण माझ्या हस्ते झाले त्यामुळे मी धन्य झालो, सदर संस्थेच्या वास्तुसाठी या परिसरातील दिगंबर गिरी यांनी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. यापुढेही शासन स्तरावर विविध प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करणार. असे मत व्यक्त केले.
आयोजकांतर्फे आमदार महेंद्र दळवी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांचेही भाषण झाले. सःस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संस्था कामार्ले विभाग वाघोली अध्यक्ष दामोदर ठाकूर, उपाध्यक्ष नंदकुमार पाटील, सचिव दत्तात्रय नांदेकर, खजिनदार जनार्दन पाटील, प्रकाश पाटील,सल्लागार बळवंत वालेकर, संचालिका पुष्पलता पाटील उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी वैभव पाटील, शिवसेना नियोजन समितीचे सदस्य संतोष निगडे, विजय पाटील, नारायण गायकवाड, किर्ती शहा उद्योजक, लायन अनिल म्हात्रे उद्योजक, चंद्रकांत वालेकर, प्रकाश पाटील , बा. रा. वाघफंजे , वसंत वालेकर, मधुकर पाटील, सुधाकर पाटील, ग्रामविकास अधिकारी सौ. जयस्वाल तसेच खारेपाट विभाग व वाघोली कामार्ले खारेपाट शहापूर परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
त्याचप्रमाणे सदर संस्थेची वास्तू उभी राहण्यासाठी कामार्ले, वाघोली, व अलिबाग तालुक्यातील अनेक दानशुर नागरिकांनी मदतीचा आर्थिक हातभार लावल्याबद्दल अशा सर्वांचे आयोजकांतर्फे आभार मानण्यात आले.