सरदार पटेल महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ थाटात संपन्न

81
सरदार पटेल महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ थाटात संपन्न

सरदार पटेल महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ थाटात संपन्न

सरदार पटेल महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ थाटात संपन्न

• परिश्रम करा. तेव्हा यश तुमच्या दारात
-डॉ. श्रीराम कावळे

• स्वप्नाला कृतीत उतरविणे आवश्यक- अरविंद सावकार पोरेड्डीवार

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 11 ऑक्टोंबर
केवळ नशिबावर अवलंबून राहू नका, आपले ध्येय सदैव उच्च ठेवा. त्यासाठी प्रचंड मेहनत,परिश्रम करा. तेव्हा यश तुमच्या दारात असेल असा मोलाचा सल्ला गोंडवाना विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी येथे बोलताना विद्यार्थ्यांना दिला.

येथील सरदार पटेल महाविद्यालयातील स्व. शांताराम पोटदुखे सभागृहात चौथा व पाचवा पदवी वितरण समारंभ व गुणवंत गौरव सोहळा मोठ्या थाटात पार पडला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार हे होते, तर यावेळी सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, जीनेश पटेल, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. जयेश चक्रवर्ती, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्याम धोपटे, प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर, शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.चंद्रदेव खैरवार प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. श्रीराम कावळे पुढे म्हणाले की, केवळ पुस्तकी नव्हे, तर अनुभवाचे शिक्षण देखील जीवन जगण्यासाठी महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांना पुरस्काराने अभिप्रेरणा, प्रोत्साहन मिळत असते. पाठीवर शाबासकीची थाप मिळाली की, पुढील जीवनाची वाटचाल सहजशक्य होते. त्याला बळ मिळते. आपल्या यशात आई-वडिलांसह शिक्षकांचे फार मोठे यशामध्ये योगदान असते.आजच्या जगात संस्काराचे धडे महत्त्वाचे असून स्वयंप्रकाशित होण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना अरविंद सावकार पोरेड्डीवार म्हणाले की, पुरस्कारामुळे नवीन काहीतरी करण्याची जिद्द मिळत असते. नुसती स्वप्न बघू नका, प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कृती करा असे त्यांनी आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पी. एम.काटकर यांनी करतांना महाविद्यालय हे केवळ संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक देखील अग्रस्थानी असल्याचे सांगत महाविद्यालयाच्या यशाचा लेखाजोखा सांगितला.

‘महाराष्ट्र गीता’ व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांचे पुरस्कारप्राप्त वार्षिकांक ‘शब्दगंधा’ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य श्याम धोपटे यांनी संघटनेच्या वतीने, तर विद्यार्थिनींच्या वतीने सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थिनी चांदणी धनकर हिने आपले मनोगत व्यक्त केले.

संचालन डॉ. शरयु पोतनूरवार, प्रा. श्वेता गुंडावार, डॉ. शितल कटकमवार, प्रा.अर्चना रॉय यांनी केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
———-
विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार- पुरस्कार वितरण सोहळ्यात स्व. ओंकारनाथ शर्मा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत समाविष्ट ५, सुवर्णपदक प्राप्त १२६, प्राध्यापकांद्वारे प्रायोजित १०६, माजी विद्यार्थी संघातर्फे १२, कनिष्ठ महाविद्यालय गुणवत्ता प्राप्त ९ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.