माणगांव पोलीस ठाणे हद्दीत फिरणाऱ्या तीन मनोरुग्णांना पुढील उपचारासाठी केले रवाना

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

माणगांव :-१० नोव्हेंबर रोजी माणगांव पोलीस ठाणे हद्दीत फिरणाऱ्या तीन मनोरुग्णांना माणगांव पोलीस ठाणे येथे प्राथमिक उपचार करून व वाघावं येथील एका महिलेस असे चार जणांना मानवतावादी कोकण संस्थेचे सचिन शिंदे याच्या सह्यायाने पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेमध्ये बसवून ठाणे येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.अशा प्रकारे गावातील मनोरुग्ण केवळ दुर्लक्ष व उपचाराविना मोकाट फिरत असतात यामुळे कायदा व सुव्यस्थेला गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच पोलिसांनी जातीने लक्ष देऊन हे कर्त्याव्य बजावलेले आहेत

माणगांव पोलीस आपले कर्त्यव्य पार पाडत असताना अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात अशाच सामाजिक बाधिलिकीतुन माणगांव पोलीस ठाण्याचे पो. नि राजेंद्र पाटील यांनी माणगांव पोलीस ठाणे हद्दीत फिरणाऱ्या तीन व गोरेगाव वाघावं बौध्दवाडी येथील एक अशा चार मनोरुग्णांना पुढील उपचारासाठी पाठविले आहे. गेले अनेक दिवसापासून माणगांव बाजारपेठ येथे मनोरुग्ण अवस्थेत मंजिरी पाठक ही महिला फिरताना अनेक लोकांनी पाहिले होते. परंतु पो. नि. राजेंद्र पाटील यांनी या महिलेस व आणखी एक इसम अशा दोन मनोरुग्णांना रत्नागिरी येथील वेड्याच्या हॉस्पिटलात पाठविण्यात आले असून मनोरुग्ण हे आता त्याच्या परिवारसोबत आहेत.

या कामगिरी बद्दल माणगांव चे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सह पोलीस निरीक्षक कीर्तीकुमार गायकवाड, पो. शि. रामनाथ डोईफोडे, ओमले,कोजे, कुवेस्कर व आपल्या पोलीस सहकारी टीमला खास धन्यवाद दिल आहे. अशा कामगिरी बद्दल कर्त्यवंदक्षतेने रायगड पोलिसांची मान उचावलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here