वडनेर मध्ये भारत बंद यशस्वी

50

वडनेर मध्ये भारत बंद यशस्वी

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

वडनेर:- केंद्र सरकारच्या कृषी धोरणाच्या निषेधार्थ आणि दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वडनेर येथे आज सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले.
स्थानिक आंबेडकर चौकात आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि शेतकरी एकत्र येऊन गावातून मुख्य रस्त्यावरून सर्व दुकाने बंद ठेवण्यासाठी हाक देत निघालेला मोर्चा वडनेर पोलीस ठाण्यात पोहोचला. शासनाच्या कृषी धोरणाच्या निषेधार्थ कृषि बिल वापस घेण्याकरिता निवेदन देण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य गुरू दयाल सिंग जुनी, अजय ढोक, महेंद्र महाजन, पांडुरंग निंबाळकर, राजीव मोरे, पंढरी शिवणकर, प्रफुल्ल देवतळे, कृष्णा महाजन, विनोद वानखेडे, गणेश जयस्वाल, अमोल चंदनखेडे आदींनी वडनेर चे ठाणेदार राजेंद्र शेट्टी यांना निवेदन देण्यात आले. सर्वपक्षीय पुकारलेला बंद 100% यशस्वी ठरला, मोर्चात स्थानिक गावातील पुरुष मंडळी महिला युवक वर्ग तसेच दारोडा गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.