‘आय लव्ह यू नीलम’ म्हणत व्यापाऱ्याची आत्महत्या

53

मुंबई ‘आय लव्ह यू नीलम’ म्हणत व्यापाऱ्याची आत्महत्या.

मुंबई:- चार इव्हेंट कंपन्यांचा मालक असलेल्या एका व्यापाऱ्याने प्रेमप्रकरणातून इंदूरमध्ये आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलिसांना एक डायरी आढळली असून त्यात ‘आय लव्ह यू नीलम’ असे लिहिले आहे. तसेच या डायरीत एका तरुणीशी असलेल्या प्रेमप्रकरणाचाही उल्लेख करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे. प्रथमदर्शनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

मुंबईतील हा इव्हेंट कंपन्यांचा मालक कामानिमित्त इंदूरला आला होता. इंदूरच्या कनाडिया भागातील एका हॉटेलमध्ये बुधवारी रात्री व्यापाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. पंकज कांबळे 28 असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या मालकीच्या चार इव्हेंट कंपन्या असून तो इव्हेंच मॅनेजमेंटचे काम करत होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तिथे या व्यापाऱ्याची डायरी पोलिसांना आढळली असून त्यात नीलम नावाच्या तरुणीचा उल्लेख आहे. तसेच व्यापाऱ्याने ‘आय लव्ह यू नीलम’ असे डायरीत लिहिले आहे. त्यामुळे प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच या डायरीत एक कोटी रुपयांचा उल्लेखही व्यापाऱ्याने केला आहे. त्यामुळे हे नेमके काय प्रकरण आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.

आपला भाऊ उत्तम इव्हेंट मॅनेजर होता. गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमध्येही त्याच्या नावाची नोंद झाल्याचे बेनी प्रसाद यांनी सांगितले. येथील स्थानिक आमदार संजय शुक्ला यांच्या मुलाच्या लग्नाच्या इव्हेंट मॅनेजमेंटसाठी पंकज इंदूरला आला होता, अशी माहिती त्यांनी दिली. त्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. त्यानंतर आपल्या साथादाराची तब्येत बिघडल्याचे सांगत तो हॉटेलमध्ये आला. सकाळी आम्ही हॉटेलमध्ये पोहचल्यावर पंकजचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली.