महापौर सौ. जयश्री महाजन यांच्या हस्ते प्रभाग क्र. 6 मधील रस्ते, गटार कामांचे भूमिपूजन

45

*महापौर सौ. जयश्री महाजन यांच्या हस्ते
प्रभाग क्र. 6 मधील रस्ते, गटार कामांचे भूमिपूजन

महापौर सौ. जयश्री महाजन यांच्या हस्ते प्रभाग क्र. 6 मधील रस्ते, गटार कामांचे भूमिपूजन
महापौर सौ. जयश्री महाजन यांच्या हस्ते
प्रभाग क्र. 6 मधील रस्ते, गटार कामांचे भूमिपूजन

जळगांव प्रतिनिधी: खंडू महाले मो.7796296480*

*जळगाव, ता. 10: शहरातील गणेशनगर भागातील बाबा हरदासराम सोसायटीत दलितेत्तर वस्ती सुधार योजनेंतर्गत एक कोटी 20 रुपये खर्चाच्या रस्ते व गटारींच्या कामांचे शुक्रवार, दि. 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते कुदळ मारून व श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. नगरसेवक श्री.धीरज सोनवणे यांनी या कामांच्या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या भागातील रस्ते तसेच गटारींच्या कामाला आता सुरूवात होणार असल्याने परिसरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

आमदार श्री.सुरेश भोळे ऊर्फ राजूमामा, माजी महापौर तथा नगरसेविका सौ.भारती सोनवणे, भाजप गटनेते श्री.भगत बालाणी, महानगरप्रमुख श्री.दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सौ.सीमा भोळे, माजी उपमहापौर तथा नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणे, नगरसेवक श्री.कैलास सोनवणे, श्री.अमित काळे, श्री.पांडुरंग ऊर्फ बंडूदादा काळे, नगरसेविका अ‍ॅड.शूचिता हाडा, सौ.मंगला चौधरी यांच्यासह श्री.हरिष तोलानी, श्री.श्यामलाल कुकरेजा, श्री.राजू अडवाणी, श्री.रमेश कुकरेजा, श्री.रोहित कटारिया, श्री.मुकेश रावलानी, श्री.जीवतराम पोपली, श्री.सुरेश कुकरेजा, श्री.चंदीराम तलरेजा, श्री.हरिष मतानी, श्री.पुरुषोत्तम नाथानी, श्री.कुणाल रावलानी, श्री.नंदलाल कटारिया, श्री.राजेश तलरेजा, श्री.सुशील हासवानी, श्री.परमानंद हेमनानी, श्री.गोविंद बजाज, श्री.वरुण रावलानी, श्री.हर्षद अडवाणी, श्री.शंकर तलरेजा तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.