विधान परिषद निवडणूक 2021: नागपूर विधानपरिषद निवडणुकीत 98.93 टक्के मतदान, 554 मतदारांनी बजावला हक्क.

50

✒युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442

नागपूर:- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर मतदार संघासाठी आज झालेल्या निवडणुकीत उमेदवाराचे भाग्य मतदान पेटीत बंद झाले आज झालेल्या निवडणुकीत 98.93 टक्के मतदान झाले. एकूण 560 मतदार या निवडणुकीत होते. मतदान संपेपर्यंत 554 मतदारांनी आपला मताधिकाराचा हक्क बजावला आहे. त्यात एका मतदाराला निवडणूक आयोगाने अपात्र घोषित केले होते तर 5 मतदारांनी या निवडणुकीचा मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही.

बुटीबोरी नगरपरिषद मतदान केंद्र क्रमाक 13/15 येथे 100 टक्के मतदान झाले. येथे एकूण 21 मतदारांनी आपला मताधिकाराचा हक्क बजावला आहे. रामटेक येथे मतदान शांततेत पार पडले. 19 मतदार होते. त्यापैकी सर्वांनी मतदान केले. 100 टक्के मतदान झाले. सावनेर नगरपरिषदचे 23 आणि खापा नगरपरिषदेचे 20 असे एकूण 43 नगरसेवकानी मतदान केले. त्यात सावनेर तहसील कार्यालय मतदान केंद्रावर 100 टक्के मतदान झाले.

नागपुर जिल्हातील एकुण 15 केंद्रावर आज विधान परिषद साठी मतदान करण्यात आले त्यात नागपूर शहरातील तीन मतदान केंद्र व ग्रामीण भागातील 12 अशे एकुण 15 मतदान केंद्र उभारण्यात आली होती.

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक असताना काँग्रेसनं आपला अधिकृत उमेदवार बदलवून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळं आता भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरूद्ध काँग्रेस समर्थीत अपक्ष उमेदवार यांच्यात हा सामना होणार आहे. ही निवडणूक चुरशीची होणार असून कुणी किती मते आपल्या पारड्यात पाडून घेतली हे 14 डिसेंबर रोजी निवडणूक निकाला नंतर स्पष्ट होईल.