वाढोणा गावात अस्वलीचा परीवार, लोकांत भितीचे वातावरण.

49

वाढोणा गावात अस्वलीचा परीवार, लोकांत भितीचे वातावरण.

वाढोणा गावात अस्वलीचा परीवार, लोकांत भितीचे वातावरण.
वाढोणा गावात अस्वलीचा परीवार, लोकांत भितीचे वातावरण.

अरुण रामुजी। भोले
नागभिड तालुका प्रतिनिधि
9403321731

नागभीड :- नागभीड तालुका मधिल तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या आलेवाही बिटातील वाढोणा गावालगत आज सकाळच्या सुमारात एक अस्वल आणि तिचे दोन पिल्ले लोकांच्या निदर्शनास आले. तेव्हा बघ्यांनी खूप मोठी गर्दी केली. अशा वेळेस कोणतेही अप्रिय घटना घडू नये म्हणून वन विभागची टीम, परिसरातील पी.आर.टी. चे सदस्य, व स्वाब नेचर केअर संस्थाचे सदस्य यांनी अस्वल असलेल्या स्थळी जाऊन अस्वलीला तिच्या पिलांसह जंगलाच्या दिशेने हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र अति उत्साही लोकांनी रस्त्यावर गर्दी करून रस्ता अडवल्यामुळे त्या अस्वलीला तिच्या पिलांसह जंगलाकडे हकलता आले नाही व ती शेती परिसरातील नदीकडे निघून गेली.

या मुळे शेतात काम करणारे व परिसरातील लोकांची भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र सध्या शेतीचे काम सुरू असल्यामुळे शेतीमध्ये काम करताना शेतकरी व शेतमजूर त्यांच्यासोबत कोणतीही अप्रिय घटना घडू नये, म्हणून वन विभाग पी.आर.टी. टीम व स्वाब नेचर केअर चे सदस्य यांनी परिसरात गस्त सुरू ठेवलेली आहे. व लोकांना सावधानता बाळगण्याची सूचना दिलेली आहे.

यावेळी तळोधी बा. परिक्षेत्राचे क्षेत्र सहायक श्री कार्तिक गरमळे, एस.एस.कुळमेथे वनरक्षक गंगासागर (हेटी) , वनचौकीदार श्री उईके,तथा पी..आर.टी. ची चमू, व स्वाब नेचर केअर संस्थेचे अध्यक्ष यशवंत कायरकर, सदस्य महेश बोरकर, सचिन निकुरे, वेदप्रकाश मेश्राम, व इत्यादी उपस्थित होते.