कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या ब्रम्हपुरी तालुक्यातील किन्ही गावातील घटना.

क्रिष्णा वैद्य
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500
ब्रम्हपुरी :- सततची नापिकी आणि बाहेरील कर्जाला कंटाळून ब्रह्मपुरी तालुक्यातील किन्ही येथील मधुकर तुळशीराम राऊत वय (६३) वर्ष या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक ११ डिसेंबर ला दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
किन्ही येथील मधुकर राऊत हे बाहेरील व नातेवाइकांकडून उसनवार घेतलेले कर्ज आणि सततच्या नापिकीमुळे चिंताग्रस्त होते. त्यामुळे त्यांची मानसिकता खचली होती. शनिवार ला दुपारच्या सुमारास मधुकर राऊत गाई शेळ्यांना चारा शेतातून चारा आणतो म्हणून सायकलने 10 वाजता घरातून बाहेर निघाले होते. मात्र दुपारनंतर ते घरी परत न आल्याने घरच्यांनी आजूबाजूला गावात शोधाशोध घेतली मात्र ते आढळून आले नाही. दुपारच्या सुमारास त्यांचा मृतदेह काही लोकांना बाभळीच्या झाडाला लटकतांनी आढळून आला त्यांनी नैराश्यातून स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपविली असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले
मधुकर राऊत हे करते पुरुष असल्याने राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातू, सून असा आप्त परिवार आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहेत.