राजसत्ता की ज्ञानसत्ता श्रेष्ठ ?

अंकुश शिंगाडे 

मो: ९३७३३५९४५०

निसर्गात काही माणसं अशीही असतात की जे चक्रव्यूहात फसत असतात. त्यांना त्या चक्रव्युहात शिरण्याचा मार्ग तर माहीत असतो. परंतू निघण्याचा मार्ग…….निघण्याचा मार्ग माहीत नसतो. अभिमन्यूचं असंच झालं. त्यानं गर्भातून चक्रव्युहात शिरण्याचं ज्ञान तर प्राप्त केलं. परंतू त्यातून निघण्याचं ज्ञान प्राप्त न केल्यानं शेवटी तो वीरगतीस प्राप्त झाला. त्या ठिकाणी ज्ञान जिंकलं नाही. कारण ते ज्ञान अधुरं होतं. राजसत्ता जिंकली. अन् राजसत्ताही जिंकली. परंतू काही वेळेपुरती. 

          आजही तीच परिस्थीती आहे. लोकं म्हणतात की राजसत्ता ही ज्ञानसत्तेपेक्षा मोठी. कारण राजसत्तेत आजही काही कौरवांचेच प्रतिनिधी दिसतात. ते ज्ञानसत्तेला महत्व देतच नाहीत. ते राजसत्तेलाच मोठं समजतात. कारण राजकारणात आता उच्च शिकलेले कमी असून निम्म शिकलेल्यांचाच भरणा जास्त आहे. आज डॉक्टरेटही करायचे असल्यास राजसत्तेच्या जोरावर डॉक्टरेट मिळवली जाते. जसे. मुलगा जन्माला घालतांना किरायाचा गर्भ घेतला जातो तसा. आज राजसत्तेचा अभ्यास केल्यास असं नक्कीच दिसतंं की राजसत्तेत जे आहेत, ते अनाडी असूनही त्यांच्यासमोर असलेेलेे सुशिक्षीत, उच्च विद्या विभुषीत लोकं लोटांगण घालत असतात. जणू गुलाम असल्यासारखे. आज राजससत्तेतील लोकं निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येतात आणि एकदा का निवडून आले की भ्रष्टाचारी मार्गाने घोटाळे करुन पैसा कमवतात. त्यानंतर ती मंडळी पैशाच्या भरवशावर शाळा, महाविद्यालय काढतात. त्या महाविद्यालयात चांगली उच्चभ्रू मंंडळी नोकरीला लावतात. अशी मंडळी ही नोकरीला लागली की ती मंडळी त्या राजसत्तेतील अनाडी माणसासमोर शेपूट हालविल्यागत वागत असते. या ठिकाणी राजसत्ता श्रेष्ठ ठरते. मग त्या महाविद्यालयात कितीही उच्च शिक्षीत मंडळी असली तरी. यावेळी समजा त्या महाविद्यालयात एखाद्या उच्चशिक्षीत तरुणानं बंड करण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला असं बेपत्ता केलं जातं की त्याला नंतर शोधणं कठीण होवून जातं. 

           राजसत्ता ज्ञानसत्तेपेक्षा मोठी नाही. ती कमजोर आहे. परंतू ती स्वतःला कमजोर समजत नाही. ती वागत असते आपल्याशी बालीश बहू बायकात बडबडल्यासारखी. उदाहरण द्यायचं झाल्यास महाभारताचं देता येईल. महाभारताचं जेव्हा युद्ध झालं, तेव्हा त्या युद्धादरम्यान कौरवांककडे पितामहा भिष्म, आचार्य द्रोण, महारथी कर्ण, कृपाचार्य यासारखे अनेक वीर होते. तसं पाहिल्यास ती राजसत्ताच होती. परंतू तरीही त्या राजसत्तेवर केवळ ज्ञानाच्या भरवशावर पांडवांनी त्या सर्व कौरवांना युद्धात हारवलं. कारण यात महत्वाचा एकच घटक होता. तो म्हणजे क्रिष्ण. क्रिष्ण ज्ञानवंत होता. म्हणून युद्ध जिंकता आलं. तसं पाहता यात ज्ञान परत एकदा जिंकलं. 

           यापुर्वी ज्ञान जिंकल्याचा पुरावा द्रोणाच्या रुपात मिळतो. तो म्हणजे द्रोणाचार्यचा विवाह झाल्यानंतरही ते गरीबच होते. आपली गरिबी दूर करण्यासाठी ते त्यांंच्या सोबत गुरुकूल आश्रमात शिकणा-या व एका नगरीचा राजा असलेल्या व त्यांचे मित्र बनलेल्या राजा ध्रृपदकडे गेलेे असता ध्रृपदनं चांगला मित्र असूनही गुरु द्रोण ज्ञानवंत असूनही त्यांचा अपमान केला व त्यांना हाकलून दिलं. यावेळी ज्ञान हारलं. परंतू त्याच ज्ञानाच्या भरवशावर द्रोणानं अर्जुनासारखे शिष्य तयार करुन राजा ध्रृपदला हारवले व त्यानंतर ज्ञानसत्ता मोठं की राजसत्ता हे सिद्ध करुन दाखवलं.

            आज पुन्हा तोोच काळ आला आहे. राजसत्ता मोठी वाटत आहे. ज्ञान लहान वाटत आहे. देशात अनेक ज्ञानी आहेत. कलावंत आहेत. कोणी प्रकाशझोतात आहेत. कोणी नाहीत. ती मंडळी फक्त कार्य करतात. प्रकाशझोतात येत नाहीत. प्रकाशझोतात येण्यासाठी प्रयत्नही करीत नाहीत. प्रकाशझोतात येणे हा काही त्यांचा उद्देेश नाही. त्यांची नेहमीच हेळसांड होत असते राजसत्तेसमोर. राजसत्ता सदोदीत त्यांचा अपमानच करीत असते. परंतू राजसत्ता काही मोठी नाही. कारण अशा कितीतरी राजसत्ता होवून गेल्या की ज्या सत्तांची आपल्याला नावही माहीत नाहीत. परंतू ज्ञानसत्ता टिकल्या आहेत. काही पुस्तके लिहून तर काही शोधाच्या रुपाने. आजही त्याच ज्ञानाचा वापर करुन आजची मंडळी वाटचाल करीत असतात आणि आजही काही मंंडळी त्याच ज्ञानाचा उपयोग करुन भविष्यातील ध्येयधोरणं ठरवीत असतात.

             महत्वाचं म्हणजे आजचा काळ पाहता आपल्याला राजसत्ता जरी मोठी वाटत असली तरी राजसत्ता मोठी नाही. ज्ञानसत्ता मोठी आहे. मग आपण त्या राजसत्तेसमोर आपल्या इवल्याशा स्वार्थासाठी लोटांगण का घालतो तेच कळत नाही. आपण जर खरंच ज्ञानवंत आहात तर लोटांगण घालू नये. कारण हे विसरु नका की आजच्या राजसत्तेला पाच वर्षानंतर मुदत भरताच त्यांना ती परत मिळविण्यासाठी लोटांंगण घालावं लागतं ज्ञानसत्तेसमोर. पुन्हा आपली प्रतिष्ठा मिळविण्यासाठी नव्हे तर राजसत्ता मिळविण्यासाठी. परंतू ज्ञानसत्तेला झुकावं लागत नाही. ती तटस्थ असते. ती तटस्थ होती कालही आणि भविष्यातही असेल. हे निर्विवाद सत्य आहे. ज्ञानसत्ता मोठीच आहे राजसत्तेपेक्षा. ज्ञानसत्तेनं राजसत्तेची मोठमोठी बुरुजं पाडली आहेत भुतकाळात. आपलं अस्तित्वही टिकवून ठेवले आहे एवढंच नाही तर आजही ती दिमाखानं सांगत आहे की ज्ञानसत्ता मोठी आहे. परंतू आजची काही मंडळी नेमकं तेच विसरली आहे. ते आपल्या स्वार्थापायी स्वतःला कमजोर समजून राजसत्तेला मोठं समजत आहेत. मोठं करीत आहेत आणि ज्ञानसत्तेला बदनाम करीत आहेत. 

            विशेष सांगायचं म्हणजे ज्ञानसत्ता काही कमजोर नाही. तिची बदनामी कोणीही करु नये. कारण आपल्याला माहीत नसेल की राजसत्ता जेव्हा सत्तेवर येते, तेव्हा हीच राजसत्ता ज्ञानसत्तेला हाताशी धरुन देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ध्येयधोरणे आखत असते आणि त्यावेळी ज्ञानसत्ताही तिला सरळ रुपानं मदत करीत असते. त्यावेळी खरंच ज्ञानसत्ता मोठी ठरते.

              वास्तवीक पाहता ज्ञानसत्ता व राजसत्ता सा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कोणालाच कनिष्ठ वा श्रेष्ठ समजता येत नाही. प्रत्येक सत्ता आपआपल्या परीनं मोठी असते. फरक एवढाच की ज्यावेळी यात स्वाप्थ शिरतो, तेव्हा प्रत्येक सत्तेला वाटतं की मी मोठी. परंतू तसं काही नाही. दोन्ही गोष्टी असल्याशिवाय देश चालू शकणार नाही. देशाची प्रगती होणार नाही. अधोगती मात्र नक्कीच होईल हे तेवढंच खरं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here