इराणमध्ये अखेर नारी शक्तीचा विजय…

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

इराणमध्ये हिजाबच्या विरोधात महिलांनी रस्त्यांवर उतरून उग्र आंदोलने केली. ही आंदोलने जगभर चर्चिली गेली कारण इराणमध्ये हिजाब संदर्भात खूप कठोर नियम आहेत. इराण हे कट्टरपंथी इस्लामी राष्ट्र असल्याने तेथील महिलांसाठी कठोर ड्रेस कोड आहेत. १९७९ साली इराणमध्ये इस्लामी क्रांती झाली तेंव्हापासून तिथे महिलांच्या ड्रेस संदर्भात कठोर नियम आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांना थेट अटक करून तुरुंगात डांबले जाते. योग्य प्रकारे हिजाब घातला नाही या कारणाने आजवर लाखो महिलांना आरोपी ठरवले गेले असून शेकडो महिलांना अटक करण्यात अली.

हिजाबच्या कठोर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका २२ वर्षीय मुलीला पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीत असतानाच त्या मुलीचा मृत्यू झाला. त्या मुलीचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला असे तेथील पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी पोलिसांच्या मारहाणीतच त्या मुलीचा मृत्यू झाला असल्याचे तेथील महिलांचे मत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी इराणमधील महिला रस्त्यांवर उतरून आंदोलने करू लागली. या आंदोलनात महिलांनी कठोर हिजाब निर्बंधांना देखील विरोध केला. कठोर हिजाबच्या विरोधात इराणची राजधानी असलेल्या तेहरान या शहरासह सर्वच महत्वाच्या शहरात महिलांनी आंदोलने केली. कुरदीस्तान या शहरात आंदोलन चालू असताना सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. या गोळीबारानंतर हे आंदोलन आणखी तीव्र होत गेले. इराणमध्ये हिजाब विरोधातील हे पहिलेच आंदोलन नव्हते २०१९ मध्येही इराणमध्ये अशाप्रकारचे आंदोलने झाले होते. यावेळी मात्र हे आंदोलन खूप तीव्र झाले असून महिला हिजाब सोबतच तेथील हुकूमशाही सरकारच्या विरोधात रस्त्यांवर उतरून घोषणा देत आहेत.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी हे इस्लामचे तज्ञ मानले जातात आणि शरिया कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यावर विश्वास ठेवतात. ते हे आंदोलन कशाप्रकारे हाताळतात याकडे सपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. सुरवातीला इराण सरकारने हे आंदोलन मोडून काढण्यासाठी कठोर भूमिका घेतली. पोलीस बळाच्या वापर केला मात्र महिला आंदोलांकर्त्या डगमगल्या नाहीत. या आंदोलनाला अमेरिका आणि इस्राईल यांची फूस असल्याचाकांगावा देखील इराणने केला मात्र त्याचाही काही उपयोग झाला. हिजाबविरोधातील हे आंदोलन काहीही करून थांबायचे नाव घेत नसल्याने अखेर इराण सरकारला नारी शक्तीपूढे झुकावे लागले. इराणचे महाधिवक्ता मोहम्मद जफर मोताजेरी यांनी म्हटले आहे की हिजाब सक्ती रद्द करण्या संदर्भात न्यायपालिका आणि संसद विचार करत आहेत. हिजाब संबंधी कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे का, असा विचार सुरू आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MediaVarta (@mediavartanews)

सरकार हिजाब सक्तीमागे घेण्याच्या विचारात आहे असे इराण सरकारच्या वतीने सांगण्यात आले ही मोठी ऐतिहासिक घटना आहे. महिला शक्तीसमोर जगातील कितीही मोठ्या शक्तीला झुकावेच लागते हेच इराणच्या महिलांनी दाखवून दिले आहे. इराण सारख्या कट्टरपंथी देशातील सरकारला नारी शक्तीपूढे झुकावे लागणे हा नारी शक्तीचा मोठा विजय आहे! 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here