थोरल्या भावाची आभाळ माया, धाकटयाला भेट दिली वडीलांची मेनाची काया …  

49

थोरल्या भावाची आभाळ माया, धाकटयाला भेट दिली वडीलांची मेनाची काया …

थोरल्या भावाची आभाळ माया, धाकटयाला भेट दिली वडीलांची मेनाची काया ...  

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्युज
मोबाईल नंबर :-9860020016

चिखली : – कोरोना महामारीत कोरोनाची लागन होवुन मरण पावलेल्या वडीलांचा मेनापासुन तयार केलेला हुबेहुब पुतळा थोरल्या भावानाने धाकटया भावाला त्याच्या वाढदिवसी भेट दिला. भावाने दिलेली ही हद्यस्पर्षी भेट सध्या चिखलीत सामाजिक स्थरावर चर्चेचा विषय ठरत आहेे. वडीलांच्या आकषमीक निधनामुळे धाकटया भावावर विरहातुन मानसीक आघात झाला. या परिस्थीतीतुन त्याला बाहेर काढण्याकरीता कुटूंबियांनी शर्थीचे प्रयत्न केले, अखेर त्याच्या वाढदिवसा निमित्त दिवंगत वडीलांचा हुबेहुब दिसणारा मेनाचा पुतळा पाहुन धाकटयाने ेअश्रुंना वाट मोकळी करून दिली.
चिखली परीसरात स्व. दिपक विष्णु विनकर यांचा मेनाचा पुतळा सामाजिक स्थरावर चर्चेस पात्र ठरत आहे. नजिकच्या पळसखेड दौलत येथील स्व. भास्करराव षिंगणे येथे स्व. दिपक विष्णु विनकर हे षिक्षक म्हणुन कार्यरत होते. कोरोना काळात स्व. विनकर सर यांचा कोरोनाची लागन झाल्याने उपचारा दरम्यान मुत्यू झाला. त्यांच्या पष्यिात पत्नी, दोन मुले, भाउ, आई असा आप्त परीवार आहे. थोरला मुलगा शुभम वय 18 डि.एड.चे षिक्षण घेत असुन धाकटा सुमिध हा 14 वर्षाचा असुन 8 वीत षिक्षण घेत आहे. वडीलांच्या निधनाचा आघात सुमिध हा सहन करू शकला नाही, त्यामुळे स्वतःची सुदबुध्द हरवुन मानसिकता खालावुन बसला आहे, त्याच्या स्वभावात चिडचिड तर कधी एकटक पाहत शांत बसणे कुटूंबियांना त्रासदायक ठरत होते. या परिस्थीतीतुन त्याला बाहेर काढण्यासाठी धोरला भाउ शुभम, आई व मामा निलेष आराख यांनी अथक प्रयत्न केले. अखेरीस कुटूंबियांच्या चर्चेतुन सुमिधला त्याच्या वाढदिवसा निमित्त आगळी वेगळी वस्तु भेट देण्याचे ठरले. जयपुर राजस्थान येथील शर्मा यांनी तयार करून दिलेला दिवंगत षिक्षक दिपक विनकर यांचा हुबेहुब दिसणारा मेनाचा पुतळा 30 नोव्हेंबर रोजी सुमिध या धाकटया भावाला धोरला भाउ शुभम याने भेट दिला.
थोरल्या भावाची आभाळ माया, धाकटयाला भेट दिली वडीलांची मेनाची काया, ही चर्चा गजानन नगरासह संपुर्ण चिखली शहरात होत आहे. याप्रसंगी हिरकणी महिला अर्बनच्या अध्यक्षा अॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे, डॉ. प-हाड,  शेषराव सावळे पाटील, कुणाल बोंद्रे, श्रीमती प्रमिलाताई जाधव, संगिताताई गाडेकर, शालीनीताई वानखेडे मुख्याध्यापक लाटे सर, मेजर षिनगारे, मिसाळ सर, बोर्डे, कासारे, गायकवाड सर, राजु लहाने, किषोर ठोंबरे, पाखरे, विजय इंगळे, शषिकांत डोंगरदिवे, बाळु कस्तुरे, देवानंद गवई आदिंची उपस्थिती होती.
मानवी जिवनामध्ये आई वडीलांचे अनन्य महत्व असुन आंधळया आई वडीलांना खांदयावर घेवून तिर्थाटन करणा-या श्रावणबाळाची पौराणीक कथा सर्वश्रृत आहे. सुमिधला मिळालेल्या हया अनोख्या भेटीमुळे वडीलांची कमतरता भरून तर निघणार नाही, परंतु भौतीक जगात वडील नसल्याचे दुःख ही त्याला होणार नाही. वडील आपल्या आजुबाजु असल्याची नेहमीच सुमिध ला प्रचिती येत राहील. बंधुत्वप्रेम कसे असावे याचे ज्वलंत उदाहरण शुभम व सुमिध या दोन भावांच्या प्रेमातुन प्रगट होत असल्याचे प्रतिपादन हिकरणी महिला अर्बनच्या अध्यक्षा अॅड.सोै.वृषालीताई बोंद्रे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.