विदर्भ साहित्य संमेलनाच्या आयोजक समितीने केली संमेलनस्थळाची पाहणी •68 वे विदर्भ साहित्य संमेलन

58

विदर्भ साहित्य संमेलनाच्या आयोजक समितीने केली संमेलनस्थळाची पाहणी

•68 वे विदर्भ साहित्य संमेलन

विदर्भ साहित्य संमेलनाच्या आयोजक समितीने केली संमेलनस्थळाची पाहणी •68 वे विदर्भ साहित्य संमेलन

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351

चंद्रपूर : 9 डिसेंबर
चंद्रपूर येथे होणार्‍या 68 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे स्थळ प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहाची आयोजक समितीकडून पाहणी करण्यात आली व विविध समिती कामांचा आढावा घेण्यात आला. यात मंच व्यवस्था पासून तर नोंदणी स्थळाची पाहणी करण्यात आली. या संमेलनाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार करतील. यावेळी 67 वे विदर्भ साहित्य संमेलनाचे पुर्वाध्यक्ष डॉ. म. रा. जोशी, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. फिरदौस मिर्जा उपस्थित राहतील. डॉ. किर्तीवर्धन दिक्षित यांच्यासह संमेलनाचे संरक्षक प्रशांत पोटदुखे, संमेलन कार्यवाह व सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, विदर्भ साहित्य संघाचे प्रतिनिधी डॉ. श्याम मोहरकार, सूर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख, सचिव प्रदीप देशमुख, संजय वैद्य, विवेक पत्तिवार, गीता देव्हारे-रायपूरे, सुनील बावणे, सुरेश गारघाटे, स्वप्नील मेश्राम व संमेलन समितीतील अन्य सदस्य उपस्थित होते.