दोन लाख रुपये घेवून मंदिरात बनावट लग्न
केज/प्रतिनिधी: दोन लाख रुपये घेवून दिपेवडगाव येथील मंदिरात लग्न लावलेली नवरी कोद्री येथे सासरी आल्यानंतर अवघ्या तीन तासानंतरच पळून जाताना पकडल्यामुळे बनावट लग्नाचा खेळ उघडकीस आला आसून नवरीसह चौघांविरुद्ध युसूफवडगाव पोलिसात गून्हा नोंद झाला आहे.या प्रकारणातील नवरी पळून जाताना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली आहे.
केज तालुक्यातील दिपेवडगाव येथील मूळ रहिवाशी व छत्रपती संभाजीनगर येथे सध्या राहणारे प्रल्हाद गुळभीले या एजंटाच्या मध्यस्थीने अंबाजोगाई तालुक्यातील कोद्री येथील नागेश देविदास जगताप वय 36 वर्षे यांचे कडुन 1 लाख 90 हजार रुपये दि.6 डिसेंबर रोजी घेवून दुपारीं साडेबारा वाजता दिपेवडगांव येथील हनुमान मंदिरात नागेश जगताप व प्रिती शिवाजी राऊत यांचा विवाह लावण्यात आला. त्या नंतर वधू,वरासह सर्व नातेवाईक कोद्री येथे गेले असता सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान नववधू प्रिती राऊत हिने शौचाला जाण्याच्या बहाण्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता गावातील एकाने तिला पहिले व ही माहिती नागेश जगताप आणि त्यांचे नातेवाईकांना दिली. तिचा शोध घेत असताना नातेवाईकांना नववधू प्रीती ही डिघोळअंबा बस स्थानकाजवळ मिळून आली.तेव्हा तिला तु का पळुन चालली आहेस ? असे विचारले.त्यानंतर नागेश जगताप व प्रीती राऊत सह नातेवाईक युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गेले.पोलीसांनी प्रिती हिची चौकशी केली असता प्रिती राऊत व तिच्या सोबत आलेली मावशी नामे सविता रा. पुणे माया सतिष राऊत रा.चाकण पुणे व प्रल्हाद गुळभीले यांनी संगनमत करून नागेश जगताप यांच्याशी लग्न लावून देतो म्हणून 1 लाख 90 हजार रुपयाची फसवणूक केल्या प्रकरणी नागेश जगताप यांच्या फिर्यादी वरून युसुफवडगाव पोलिसात एजेंट सतिष प्रल्हाद गुळभिले,नवरी प्रिती शिवाजी राऊत, तिची मावशी सविता,व माया राऊत या चौघां विरुध्द फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेडगे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उप निरीक्षक भिमराव मांजरे हे पुढील तपास करीत आहेत.
नोटरी ही चौकशीच्या फेऱ्यात..
या प्रकरणी एजन्ट प्रल्हाद गुळभीले,नववधुच्या 2 मावशी सह केज येथील नोटरी करून देणारे नोटरी व लग्नाआधीच पती कडील नावाचे बनावट आधारकार्ड तयार करणारे संगणक तंत्रज्ञ हे सर्वजण चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून या सर्वांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांनी दिली आहे.
नवरीला पोलिस कोठडी
नववधू प्रीती राऊत हिला केज न्यायालया समोर पोलिसांनी हजर केले असता तीला 10 डिसेंबर पर्यंत 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचेआदेश न्यायालयाने दिले आहेत.









