महापरिनिर्वाण दिनी अनिता खरात यांची माशाचा पाढा वृद्धाश्रमाला भेट; ज्येष्ठांना फळ वाटप
मुंबई: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मीरा रोड परिसरातील माशाचा पाढा वृद्धाश्रमात सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. न्यू प्रगती एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका अनिता खरात यांनी वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला तसेच फळांचे वाटप करून आपुलकी व्यक्त केली.

महापरिनिर्वाण दिन सामाजिक संवेदनांचा जागर प्रसंग मानला जातो. त्या अनुषंगाने अनिता खरात यांनी वृद्धांच्या गरजा, सुविधा आणि त्यांच्या दैनंदिन अडचणींबाबत व्यवस्थापनाशी चर्चा केली. त्यांच्या भेटीमुळे वृद्धाश्रमातील रहिवाशांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसून आले.
न्यू प्रगती एज्युकेशन ट्रस्टच्या या उपक्रमाचे परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून समाजातील ज्येष्ठ घटकांच्या सन्मानासाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नांवर सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
सदर कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष – मा. गणेश दिनकर खरात, उपाध्यक्ष – मा. सुनील कांबळे, खजिनदार – अॅड. चंद्रकांत सोनवणे, सहसचिव – इंजि. महेश गडांकुश, सदस्य – मा. सुनिता सोनवणे, सदस्य – मा. सारिका गडांकुश, सदस्य – मा. विजय काळे, सदस्य – मा. शितल घाणेकर इत्यादी मान्यवरांचे सहकार्य आणि उपस्थिती राहिली.









