नागपूर-पुणे धावत्या लक्झरी बसमध्ये युवतीवर क्लिनरनेच केला बलात्कार.

59

नागपूर-पुणे धावत्या लक्झरी बसमध्ये युवतीवर क्लिनरनेच केला बलात्कार.

वाशीम:- नागपूर-पुणे मार्गावर धावणाऱ्या खासगी बसमध्ये स्लीपर कोच एका 21 वर्षीय युवतीवर बसच्या क्लिनरनेच बलात्कार केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली. ही घटना मालेगाव पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या महामार्गावर 6 जानेवारीला मध्यरात्री दरम्यान घडली.

गोंदिया जिल्ह्यातील एका गावामध्ये वास्तव्यास असलेली 21 वर्षीय युवती ही पुणे येथील एका खासगी कंपणीत (एमआयडीसी परिसर) नोकरी करते. पिडीत युवती ही तिच्या बहिण्याच्या लग्नानिमित्त भंडारा जिल्ह्यातील आपल्या गावी आली होती. बहिणीचे लग्न आटोपुन 5 जानेवारीला दुपारी 4.30 वाजता नागपुर येथुन गुडविल ट्रॅव्हल्सने (स्लिपर कोच)  पुणे येथे परत निघाली होती.

प्रवासादरम्यान ट्रॅव्हलचा क्लिनर समीर देवकर वय 25 रा. सिताबर्डी , नागपुर हा पिडीत युवतीच्या शेजारी जाऊन तिच्याशी बिलगला असता युवतीने ओरडण्याचा प्रयत्न केला. परंतु  समिर याने पिडीत युवतीचे तोंड दाबुन धरून चाकुचा धाक दाखवला. जीवाच्या भितीने घाबरलेल्या युवतीवर आरोपी समिर याने दोन वेळा बलात्कार केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले. 6 जानेवारीला ही ट्रॅव्हल्स सकाळी पुणे येथे पोहचल्यावर पिडीत युवतीने तीच्या एका मित्राला फोन करून आपबिती सांगितली. त्यानंतर पिडीत युवती आणी तिच्या मित्राने पुणे येथील ग्रामीण पोलीस स्टेशन गाठुन फिर्याद नोंदविली. या फिर्यादीनुसार समिर देवकर याचेविरूध्द भादंविचे कलम ३७६ (२) (एन) ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनास्थळ हे मालेगाव बायपास जि. वाशिम असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी हे प्रकरण मालेगाव पोलीस ठाण्याला वर्ग केले.