औरंगाबाद अवघ्या 16 व्या वर्षात अनाथ मुलीचं दोनदा लग्न, त्यानंतर देखील सामूहिक अत्याचाराची ‘शिकार’

औरंगाबाद:-  नियतीने लहानपणीच आई-वडिलाचे छत्र नाहीसे केले. त्यानंतर दत्तक आई-वडिलांनी तिचे अवघ्या 16 व्या वर्षी राजस्थानातील तरुणासोबत लग्न लावले. मात्र, तेथेही तिचा छळ सुरू झाल्यानंतर ती शेजारच्या मदतीने खासगी ट्रॅव्हल बसने औरंगाबादेत पोहोचली. त्यानंतर औरंगाबाद रेल्वेस्थानक परिसरात भेटलेल्या तरुणाने तिला स्वतःच्या घरी नेले आणि मंदिरात तिच्यासोबत लग्न केले. मात्र तोही मारहाण करू लागल्यामुळे त्याचे घर सोडून रेल्वेस्टेशन परिसरात झोपलेल्या पीडितेवर 3 नराधमांनी अत्याचार केले. या आभागी तरुणीवर अत्याचार करणारे नराधम पोलिसांना 3 दिवसांनंतरही सापडले नाहीत.

वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेलल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील रहिवासी रिमा (काल्पनिक नाव) ही 8 जानेवारी रोजी रात्री चिकलठाणा रेल्वेस्टेशन येथे एकटीच बसली होती. ती एकटीच बसल्याचे पाहून सतर्क नागरिकाने पोलिसांना आणि चाइल्डलाइनला फोन करून माहिती दिली. पोलीस आणि चाइल्डलाइनच्या महिला कार्यकर्त्यांनी तिला विश्वासात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. नंतर तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. तिने दिलेल्या जबाब महिला दक्षता समितीच्या पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांचा थरकाप उडविणारा होता. औरंगाबाद रेल्वेस्थानक येथे एकटी असताना पोलिसांनी तिला तेथून बाहेर जाण्यास सांगितले.

यामुळे ती स्थानकातून बाहेर पडली आणि काही अंतरावर झाडाच्या आडोशाला जाऊन झोपली. रात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास ती लघुशंका करण्यासाठी तेथून काही अंतरावर गेली तेव्हा तीन नराधम तिच्यावर तुटून पडले. त्यांनी तिला तेथून उचलून अन्य ठिकाणी नेले आणि अत्याचार केल्याने ती बेशुद्ध झाली. ती शुद्धीवर आली तेंव्हा तिच्या अंगावरील कपडे बाजूला पडलेले दिसले. तिने ते कपडे घातले. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला. तिच्यावर अत्याचार करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी संशयितांची धरपकड आणि चौकशी सुरू केली. नराधमाची ओळख पटविणे पोलिसांसाठी आव्हान आहे. पोलीस उपायुक्त मीना मकवाना, सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ हे स्वतः या तपासांवर लक्ष ठेवून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here