15 हजार रुपयाची लाच घेताना वनरक्षकाला अटक

सातारा लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी वखार चालकाला 25 हजार रुपयांची लाच मागून सेटलमेंटमध्ये त्यापैकी 15 हजार रुपयांची लाच..

सातारा:- लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी वखार चालकाला 25 हजार रुपयांची लाच मागून सेटलमेंटमध्ये त्यापैकी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना राहुल बजरंग रणदिवे वय 34, रा. कोयना सोसायटी, विलासपूर, सातारा या वनरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

या प्रकरणातील तक्रारदार हे पाली येथील वखार चालक आहेत. संबंधित वखारीवर कारवाई न करण्यासाठी वनरक्षक पदावर असणार्‍या राहुल रणदिवे याने तक्रारदारांना 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. एसीबीने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर 25 हजार रुपयांवरुन 15 हजार रुपये घेण्याचे अखेर ठरले. 15 हजार रुपये लाचेची रक्कम वनरक्षक राहूल रणदिवे याने पाली येथे स्वीकारले. पैसे स्वीकारताच एसीबीच्या पथकाने रणदिवे याला रंगेहाथ पकडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here