मित्राची पत्नी निवडणुकीपुरती घेतली ‘उधार’; जिंकल्यानंतर फिरली नियत.

डेहराडून:- एका व्यक्तीने निवडणूक  लढवण्यासाठी आपल्या मित्राला विनंती करून तात्पुरतं त्याच्या पत्नीला आपली म्हणून दाखवत निवडणूक लढवली. निवडणुकीत माहिती दाखवताना विवाहित दाखवण्यासाठी मित्र आणि मित्राच्या पत्नीला तयार केलं. उमेदवाराची बायको म्हणून ती अक्टिंग करणार होती आणि तिनंही तसं कबूल केलं. निवडणुकीनंतर ही महिला चेअरमन झाली आणि आपल्या पहिल्या पतीकडे आणि मुलांकडे न जाता पतीच्या मित्राबरोबरच विवाह करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने पहिल्या पतीला घटस्फोट दिला असून मित्राने आपली फसवणूक केल्याप्रकरणी महिलेच्या पहिल्या पतीने पोलिसांमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे पोलीस देखील चक्रावले असून या प्रकरणाची आसपासच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरादाबादच्या  एका विवाहित व्यक्तीने दोन वर्षांपूर्वी नगर पंचायतीच्या निवडणुकीत चेअरमन पदासाठी उमेदवार म्हणून आपल्या मित्राच्या पत्नीला उधार मागितले. यामध्ये दोघांच्या सहमतीने या निवडणुकीत मित्राच्या पत्नीबरोबर केवळ निवडणुकीपुरता विवाह केला. या संदर्भात त्यांनी कागदपत्रावर लिहून देखील घेतले होते. निवडणूक झाल्यानंतर पुन्हा पत्नीला परत देण्याचे आश्वासन देखील यामध्ये देण्यात आले होते. निवडणूक जिंकून ती महिला चेअरमन झाली. परंतु निवडणूक जिंकल्यानंतर या व्यक्तीने या महिलेला पतीकडे न सोपवत तिच्याशी विवाह केला. यामुळे आपली फसवणूक झाल्याने या व्यक्तीने पोलिसांमध्ये दोघांविरोधात गुन्हा नोंदविला. पण यामध्ये महत्त्वाचे म्हणजे या व्यक्तीच्या पत्नीने त्याच्याविरोधात आणि भावाविरोधात मारहाणीचा आरोप करत तिचे शोषण झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

महिलेने परत येण्यास नकार दिल्यानंतर तिच्या पहिल्या पतीने जसपूर न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत त्याची पत्नी परत देण्याची विनंती केली. त्याच्या या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या चेअरमन महिलेने पतीच्या मित्राबरोबर विवाह केल्यानंतर तिच्या घरात दुसऱ्या नवऱ्याच्या पहिल्या पत्नीची ढवळाढवळ वाढू लागल्याने या महिलेच्या आणि पतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होऊ लागले. यामुळे महिला आपल्या भावासह वेगळी राहू लागली. त्यानंतर एकदिवस तिचा भाऊ बाहेर गेला असताना दुसरा पती आणि त्याच्या भावाने घरात घुसून माझ्याबरोबर गैरवर्तन करत मारहाण केल्याचा आरोप चेअरमन महिलेने केला आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here