मुंबई पाण्याचा पाईप लावण्यासाठी गेलेल्या मुलीला उचलून नेलं, 13 वर्षीय मुलीवर बलात्कार.
घराबाहेर पाण्याचा पाईप लावण्यासाठी गेलेल्या मुलीला नराधमांनी जबरदस्तीने उचलून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.
अशोक शाही प्रतिनिधी
विरार :- मुंबईजवळचं नालासोपारा पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने हादरलं आहे. नालासोपाऱ्यात जीवे मारण्याची धमकी देऊन 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. घराबाहेर पाण्याचा पाईप लावण्यासाठी गेलेल्या मुलीला नराधमांनी जबरदस्तीने उचलून नेलं. एका मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या टेम्पोत नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मुलीच्या आरडाओरड्यामुळे ही घटना उघडकीस आली. मात्र तोपर्यंत बलात्कार करून आरोपी फरार झाले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी 8 जानेवारीला रात्री 9 च्या सुमारास घडली. याप्रकरणी वसईतील वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.