पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाचा खून.

49

पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाचा खून.

राहाता:- पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीसह चौघांनी केलेल्या जबर मारहाणीत एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आज दि.11 सायंकाळी पाच वाजता पिंपळस शिवारात घडली.

याबाबत राहाता पोलीस ठाण्यात श्‍याम जेजूरकर नायगाव, ता. सिन्नर यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, 11 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आपणास व राहुल जेजूरकर यास एका व्यक्तीने राहाता न्यायालयाच्या मागे पिंपळ हद्दीत बोलावून घेतले. यावेळी या व्यक्ती समवेत त्याचा भाऊ व दोन अनोळखी व्यक्ती होत्या.

या व्यक्तीने राहुल जेजूरकर याच्याशी आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून वाद घातला. तसेच आम्हाला लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण केली. त्यानंतर आम्हाला शिर्डी येथील साई बाबा सुपर हॉस्पिटलमध्ये उपचाराकरीता दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान राहुल जेजूरकर यांचा मुत्यू झाला. श्‍याम जेजूरकर यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये करीत आहेत.