सरकार कडून सिरम इन्स्टिट्यूटला मिळाली लसीची पाहिली ऑर्डर, किंमतहि केली जाणार जाहीर.

हिरामण गोरेगांवकर

नवी दिल्ली :- देशात लवकरच कोरोना लसीकरणाला सुरवात होणार आहे. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला केंद्र सरकारकडून पहिली ऑर्डर मिळाल्याची माहिती समोर आली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला केंद्र सरकारने पहिली ऑर्डर दिल्याचे वृत्त (एएनआय )या वृत्त संस्थेने दिल आहे. या सोबत लसीची किंमत देखील समोर आली आहे. लसीच्या एका डोसाची किंमत रु 200 इतकी असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यानी दिली आहे.

देशात 16जानेवारीपासून लसीकरण…
सिरम इन्स्टिट्यूटने ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार केला असून कोविशील्ड लसीची निर्मिती केली आहे. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरवात केली जाणार आहे. यात सुरवातीला अत्यावश्यक सेवेतील 3 कोटी अधिकारी आणि कर्मचारी याना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर 50 वर्षावरील नागरिक व गंभीर स्वरूपाच्या आजारांनी ग्रासलेल्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे..

लसीच्या वाहतुकीसाठी सज्ज..
सिरम इन्स्टिट्यूटकडून लसीच्या वाहतुकीची तयारी देखील पुर्ण झाली आहे. कुल -एक्स -कोल्ड चैन लिमिटेड कंपनी देशाच्या कानाकोपऱ्यात लसीची वाहतूक करणार आहे. सिरम इन्स्टिट्यूटच्या बाहेर कोल्ड स्टोरेज वाहन देखील सज्ज ठेवण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here