देशांतर्गत वापरासाठी सिरम इन्स्टिट्यूटच्या ” कोविशील्ड ” लसीचे तीन कंटेनर रवाना.

हिरामण गोरेगांवकर

पुणे:- कोरोनाच्या प्रतिकारासाठी सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोविशील्ड लसीचे 3 कंटेनर आज देशांतर्गत वापरासाठी कंपनीतून पहाटे 4:30 वा लोहगाव विमानतळाकडे रवाना झाले. कम्पनीचे मांजरी कार्यालय ते लोहगाव या वाहतुकीसाठी विशेष पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला होता.  कोरोना महामारीवर उपयुक्त ठरणाऱ्या या बहुप्रतीक्षित लसीची जगभरातील नागरिक अगदी आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आवश्यक ते सर्व सोपस्कार पार पाडत सिरम कंपनीने ही लस देशांतर्गत नागरिकांना वापरासाठी उपलब्द करुन दिली. कंपनीच्या मांजरी येथील कार्यालयाच्या प्रांगणात कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंटेनरची पूजा केल्यांनतर या कोल्ड चेन व्हॅन लोहगाव विमानतळाकडे रवाना झाल्या. पहिल्या टप्यात या लसीचा वापर प्रामुख्याने कोरोना वारियर्ससाठी करण्यात येणार आहे. कंपनीला सुरवातीला 2 कोटी  डोस ची ऑर्डर मिळाली आहे. त्यापैकी 65लाख डोस आज देशभरातील विविध राज्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


लस वाहतुकीसाठी विशेष प्रकारच्या कोल्ड चेन व्हॅन वापरण्यात आल्या. ही लस 2 ते 8 अंश सेल्शिअस इतक्या तापमानात ठेवणे आवश्यक असल्याने ह्या व्हॅन मधून तितके तापमान नियंत्रित करण्यात आले आहे. कंपनीच्या स्वतःच्या आणि भाडयाच्या व्हॅन लस वाहतुकीसाठी वापरण्यात आल्या आहेत. लोहगाव विमानतळावरून लगेचच देशातील विविध राज्यामध्ये या लसीची वाहतूक करण्यात येईल अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे सहाय्यक निर्यात अधिकारी हनुमंत अलकुंटे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here