शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्थेकडून स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंती उत्सव साजरा

50

शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्थेकडून स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंती उत्सव साजरा

शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्थेकडून स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंती उत्सव साजरा

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512046📱

लाखनी :- शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्था खराशी आपल्या वर्षभर नानाविविध राष्ट्रीय सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रमांनी विदर्भात सुप्रसिद्ध आहे.स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त सद्भावना दिंडीचे भव्य आयोजन मागील अनेक वर्षांपासून करीत असते मा.जिजाऊ जयंती निमित्ताने कर्तबगार महिलांचा सन्मान हा 12 जानेवारीला दरवर्षीच नियोजित कार्यक्रम असतो.मागील वर्षी भव्य सद्भावना दिंडी करत युवा जागर कार्यक्रम पार पडला होता.या वर्षी तसेच त्या प्रकारचे नियोजन होते. मात्र कोरोना संकटामुळे सद्भावना दौड व युवा जागर कार्यक्रमाला स्थगिती देऊन खराशी शिवतीर्थ कार्यालयात आज दिनांक 12 जानेवारी 2022 स्वामी विवेकानंद व मा जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खराशी गावच्या महिला सरपंच सौ.अंकिता झलके प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुशीलाबाई बोंद्रे,सौ.स्वेता चेटुले,सौ. मनीषा तवाडे, दिनेश चेटुले, नयन चेटुले उपस्थित होते.
नयन चेटुले यांनी या कार्यक्रमात एक संकल्प घेतला की तो म्हणजे आयुष्यभर व्यसनमुक्त संस्थेचे संस्थापक आदर्श शिक्षक डमदेव कहालकर यांनी संकल्प दिला.मा जिजाऊ जयंती निमित्ताने महिला सरपंच सौ.अंकिता झलके यांच्या सन्मान सौ.मीरा डमदेव कहालकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक डमदेव कहालकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेच्या मीरा कहालकर यांनी पार पाडले.