ट्विंकल इंग्लिश स्कुल, नागभीड येथे 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोवीड लसीकरण
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*
नागभिड : – केंद्र सरकारच्या निर्णयानंतर 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थी व युवकांना कोवीड लसीकरणाची नागभीड येथे सुरूवात करण्यात आली. नागभीड येथील श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभीड, येथे आज दिनांक 11/01/2022 रोजी 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोवीड लसीकरण करण्यात आले.
लसीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जि.प. सदस्य संजय गजपुरे, समिधा सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा नागभीड न.प. चे उपाध्यक्ष श्री. गणेश तर्वेकर तसेच समिधा सेवा संस्थेचे सचिव श्री. अजय काबरा, शाळेच्या प्राचार्या सौ. शुभांगी पोहेकर, मुख्याध्यापिका श्रीमती संगीता नारनवरे इ. मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कोवीड लसीकरणाची माहिती देत शासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच कोरोना पासुन बचाव करीत उत्तम आरोग्य ठेवण्याचा सल्ला दिला व घरी राहुन नियमित अभ्यास करण्याच्या सुचना दिल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगांव पांडव येथील आरोग्य अधिकारी-डॉ.आकाश चकोले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवीका-अर्चना निखारे, आरोग्य सेवक-परशुराम दुब्बलवार, आरोग्य सेवीका-मिनल रासपल्ले, डाटा एन्ट्री ऑपरेटर- स्वाती ठेंगरी व विद्यानंद सोनडवले, मदतनीस-सिमा पातेवार या चमुने लसीकरणाला सुरूवात केली.