वनविभागाच्या दडपशाही धोरणाविरुद्धच्या आक्रोश मोर्चाला स्थगिती:-राजु झोडे
ओमिक्रोन (कोरोना) चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घेतला निर्णय
सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694
*चंद्रपुर*:-ताडोबा बफर झोन क्षेत्रांतर्गत श्री गुरुप्रसाद व वन विभागाच्या अमानवीय अन्याय-अत्याचाराला घेऊन दडपशाही धोरणाविरोधात उलगुलान संघटने द्वारा राजु झोडे यांच्या नेतृत्वात आदिवासी व दलित तसेच जबरान जोत शेतकऱ्यांना घेऊन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चाला कोरोना चा प्रादुर्भाव संपेपर्यंत स्थगिती देऊन आमचा लढा असाच सुरू राहणार असे प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू झोडे यांनी सांगितले.
सध्या देशभरात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे.त्यामुळे शासकीय व प्रशासकीय स्तरावरून विविध निर्बंध आलेले आहेत तसेच कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता गर्दी जमवणे हे नैतीकतेच्या विरोधात आहे. उलगुलान संघटना सदैव लोक ही त्याच्या बाजूनेच असते. पोलिस प्रशासनाकडून व तालुका प्रशासनाकडून आक्रोश मोर्चा न घेण्याबाबतचे पत्र मिळाले असून परवानगी सुद्धा नाकारलेली आहे याकरिता उद्या दिनांक १२ जानेवारीला होणारा आक्रोश मोर्चा काही काळापर्यंत स्थगित करण्यात येत आहे याची मोर्चाला येणाऱ्या सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन राजू झोडे यांनी केले आहे. परंतु वनविभागाच्याअत्याचाराविरोधात लढा ताकतीने सुरू राहणार असेही सांगितले.