सेंट पीटर (बेला) शाळेत शासनाच्या कोरोना नियमांचे उल्लंघन.

59

सेंट पीटर (बेला) शाळेत शासनाच्या कोरोना नियमांचे उल्लंघन.

सेंट पीटर (बेला) शाळेत शासनाच्या कोरोना नियमांचे उल्लंघन.

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/भंडारा :-सेंट पीटर शाळा बेला येथे दिनांक ३-१-२०२२ पासून शाळेत सराव परीक्षा घेण्यात आली. त्यात एका वर्गात 48 तर दुसऱ्या वर्गात 64 विद्यार्थी बसवण्यात आले अशा प्रकारे सराव परीक्षा घेण्यात आली त्यात सुश्मिता भुरे नामक विद्यार्थिनी इयत्ता ६ व्या वर्गात असुन कोरोना पॉझिटिव होती तरी तीला सराव परिक्षेत बसवून तिच्याकडून परीक्षा घेण्यात आली. यात शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ मांडल्याचे समजते.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी शासनाने अनेक निर्बंध कायदे काढून सुव्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करत असून एकीकडे शाळेचे मुख्याध्यापकच विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळून एका वर्गखोलीत सुरक्षित अंतर न ठेवता 48 विद्यार्थी एकाच वर्गात बसवून सोशलडिस्टंसिंगचा फज्जा उडवत त्यांच्याकडून परीक्षा घेतली जाते ही चिंतेची बाब आहे.
अपणास विनंती आहे कि सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी करून संबंधित शालेय अधिका-यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी प्रहार विद्यार्थी संघटनेची मागणी असुन सदर प्रकरणाचा संपूर्ण अहवाल विद्यार्थी संघटनेला कळवावा. जेनेकरुन आम्हाला उपोषण आंदोलनाची वेळ येणार नाही.असे निवेदन जिल्हाधिकारी साहेब भंडारा यांना प्रहार विद्यार्थी संघटने तर्फे देण्यात आले यावेळी प्रहार विद्यार्थी संघटना भंडारा जिल्हाप्रमुख चारूल रामटेके , प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सचिव जयेंद्र देशपांडे, रवि मने, प्रहार विद्यार्थी संघटना भंडारा शहर प्रमुख आदेश मेश्राम,शहर सचिव मंथन मेंढे उपस्थित होते ..