स्वामी विवेकानंद शिबिराच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
,सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694
कोरपना :१२ जाने.आजकाल साधूसंताबद्दल मीडियाद्वारे प्रसारित माहितीने तरुणवर्गात एक नकारात्मक समज झाला आहे. वास्तविकपणे खरे संत मानवसेवेचीच प्रेरणा देतात. यॊग्य साधुत्व सेवेच्या तळमळीतून व्यक्त होते. त्यांचा सन्मान होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन रामकृष्ण विवेकानंद सेवा समिती, चंद्रपूरचे सदस्य तसेच ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस यांनी केले.
स्वामी विवेकानंद जयंती आयोजन समितीतर्फे आयोजित स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. विविध संस्थाच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर श्रीकृष्ण सभागृह येथे घेण्यात आले. यावेळी 56 रक्तदात्यानी रक्तदान केले. या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोरपनाचे ठाणेदार सदाशिव ढाकणे, शेतकरी संघटनेचे अरुणजी नवले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयरावजी बावणे, नेहरू युवा केंद्राचे सचिन कुडमेथे, ब्रदर्स ऑन ड्युटीचे दिनेशभाऊ राठोड, शासकीय रक्तपेढी चंद्रपूरचे डॉ. पवार, आदिलाबाद येथील बेस्ट फ्रेंड्स संस्थेतर्फे डॉ. रेड्डी, गुरुदेव सेवा मंडळाचे मिन्नाथ महाराज पेटकर, अंबुजा फाउंडेशनचे संतोष आकेवार उपस्थित होते. प्रमुख पाहुण्याची रक्तदान उपक्रमाबद्दल प्रशंसोद्गार काढले. संचालन अंबुजा फाउंडेशनच्या अंजली खारकर यांनी केले.
आयोजकांनी सर्व रक्तदात्यांची आभार मानले.