३९ वर्षानंतर प्रथमच गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला

54

३९ वर्षानंतर प्रथमच गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला

२४५.५०० मिटरची पाण्याची पातळी गाठली

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी /भंडारा :-वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या आणि नागपूर, चंद्रपूर व भंडारा या तीन जिल्ह्याला नवसंजीवनी देणारा गोसेखुर्द हा महत्वकांशी प्रकल्प आज पूर्ण क्षमतेने भरला. तब्बल ३९ वर्षानंतर प्रथमच गोसेखुर्द प्रकल्प २४५.५०० मीटर पूर्ण क्षमतेने भरला आहे.

तीन जिल्ह्यांसाठी महत्वकांशी असलेल्या या प्रकल्पाची पायाभरणी १९८३ मध्ये करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसे गावाजवळ हा प्रकल्प आहे. सुमारे अडीच लाख हेक्टर शेतीचे सिंचन करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. अद्यापही हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही, हे विशेष. असे असतानाही सध्याच्या परिस्थितीत प्रकल्पाचे काम ज्या स्तरापर्यंत पोहोचले आहे, त्या स्तरापर्यंतच्या क्षमतेनुसार गोसेखुर्द प्रकल्प हा आज पूर्णपणे १०० टक्के भरला असे म्हणता येईल.

राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा प्राप्त या गोसेखुर्द प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता २४५.५०० मीटरची आहे. मात्र, पूर्ण क्षमतेने आजतागायत हा प्रकल्प कधीही भरला गेला नाही. यावर्षी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दृष्टीने प्रकल्प अधिकाऱ्यांनी संकल्प केला. त्यादृष्टीने जलसाठ्यात वाढ होत असल्याने गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरमुळे परिसरातील अनेक गावे, शेती, वसाहती प्रभावित झालेल्या आहेत. किंबहुना अनेकांच्या शेती बुडाल्याने आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोतही थांबले आहेत. ज्या घरांना किंवा शेतीला आजतागायत गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरचा फटका बसला नाही, अशाही शेतजमिनी आणि घरे गोसेच्या पाण्याच्या कवेत आल्या आहेत.
तीन जिल्ह्यातील शेतजमीन संपादितगोसेखुर्द धरण क्षेत्रात भंडारा जिल्ह्यातील १०४ गावे, नागपूर जिल्ह्यातील ७९ गावे बाधित झालेली आहेत. त्यात भंडारा जिल्ह्यातील १२ हजार ४७५ हेक्टर पैकी १२ हजार ३३१ हेक्टर जमिनीचे संपादन झालेले आहेत. तर नागपूर जिल्ह्यातील ३३.२६ हेक्टर पैकी २७.९६ टॅक्टर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील २ हजार ६८२ हेक्टर शेत जमिनीपैकी २ हजार ६३२ टॅक्टर शेत जमीन संपादित केलेली आहे. चौकट संपादित केलेली आहे.

हरितक्रांतीचे स्वप्न पूर्णत्वासमहत्वकांशी गोसेखुर्द धरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्णत्वास आले आहे. या प्रकल्पामुळे भंडारा जिल्ह्यातील ८९ हजार ८५६ हेक्टर, नागपूर जिल्ह्यातील १९ हजार ४८१ हेक्टर तर चंद्रपूर जिल्ह्यातील १ लाख ४१ बाजार ४६३ हेक्टर जमीनचे सिंचन होणार आहे. या प्रकल्पाचे डावा आणि उजवा असे दोन कालवे आहे. डावा कालवा २३ किलोमीटरचा तर उजवा कालवा हा सुमारे ९९ किलोमीटरचा आहे. या दोन्ही कालव्याच्या माध्यमातून भंडारा नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतीला पाणी पुरविल्या जात आहे.

शेतजमीनधारकांची स्वप्नपूर्ती कधी?या महत्वकांशी गोसीखुर्द धरणाच्या निर्मितीसाठी तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, अद्यापही या शेतकऱ्यांना आवश्यक असलेला मोबदला सरकारकडून मिळालेला नाही. किंबहुना तो मिळावा, यासाठी आजही येथील शेतकरीराजा प्रशासन आणि सरकारची लढा देत आहे. एकीकडे ३९ वर्षानंतर पाणीपातळी गाठल्याची स्वप्नपूर्ती झाली असली तरी, ज्या शेतकऱ्यांच्या भरोशावर यांच्या शेतजमिनी संपादित करून हा प्रकल्प उभारण्यात आला, त्यांना अद्यापही न्याय न मिळाल्याने त्यांची स्वप्नपूर्ती कधी होईल होणार? हा प्रश्न अजूनही ते विचारीत आहेत.