मालमत्तेच्या वादातून सख्खे भाऊ झाले वैरी , लहान भावाने मित्राच्या मदतीने सख्या मोठ्या भावाच्या केला खून जमिनीत दफन केलेले मृत शरीर सात महिन्यांनी पोलिसांनी काढल्याने सत्य आले बाहेर कोराडी पोलीस ठाण्याची कामगिरी गुन्हेगारांना अटक

30
मालमत्तेच्या वादातून सख्खे भाऊ झाले वैरी , लहान भावाने मित्राच्या मदतीने सख्या मोठ्या भावाच्या केला खून जमिनीत दफन केलेले मृत शरीर सात महिन्यांनी पोलिसांनी काढल्याने सत्य आले बाहेर कोराडी पोलीस ठाण्याची कामगिरी गुन्हेगारांना अटक

मालमत्तेच्या वादातून सख्खे भाऊ झाले वैरी , लहान भावाने मित्राच्या मदतीने सख्या मोठ्या भावाच्या केला खून

जमिनीत दफन केलेले मृत शरीर सात महिन्यांनी पोलिसांनी काढल्याने सत्य आले बाहेर

कोराडी पोलीस ठाण्याची कामगिरी गुन्हेगारांना अटक

मालमत्तेच्या वादातून सख्खे भाऊ झाले वैरी , लहान भावाने मित्राच्या मदतीने सख्या मोठ्या भावाच्या केला खून जमिनीत दफन केलेले मृत शरीर सात महिन्यांनी पोलिसांनी काढल्याने सत्य आले बाहेर कोराडी पोलीस ठाण्याची कामगिरी गुन्हेगारांना अटक

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कोराडी पोलीस स्टेशन हद्दीत मालमत्तेच्या वादातून सख्खे भाऊ झाले वैरी , लहान भावाने मित्राच्या सहाय्याने मोठ्या भावाच्या केला खून अशी थरारक घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर असे की, मालमत्तेच्या वादातून एका व्यक्तीने मित्राच्या मदतीने सख्ख्या मोठ्या भावाचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तब्बल सात महिन्यांनी सत्य बाहेर आले आहे. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी मृतक व्यापाऱ्याचा भाऊ आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. चंदन दीपचंद हिंगणकर ( वय ४० वर्षे ), मनोहर कवडू दुधबरवे ( वय ४८ वर्षे ) अशी आरोपींची नावे आहेत, तर विलास हिंगणकर ( वय ५० वर्षे ) असे मृताचे नाव आहे. 
दोघांच्याही भावांना निवृत्तीनंतर मोठी रक्कम मिळाली. या रकमेतून हिंगणकर बंधूंनी कोराडी येथील सुरादेवी येथे चार एकर जमिनीवर सिमेंटच्या विटा तयार करण्याचे काम सुरू केले. यासोबतच त्यांनी रेती-गिट्टी, मातीची कामेही सुरू केली. त्यांनी वाहतुकीसाठी टिप्परही भाड्याने घेतले. हा सगळा व्यवसाय विलास चालवत होता. तो आक्रमक स्वभावाचा होता. व्यवसाय तोट्यात चालला होता. यामुळे वडिलोपार्जित संपत्ती विकावी लागली व कर्जदेखील झाले होते. चंदनने हिशेब विचारल्यावर विलास शिवीगाळ करत मारहाण करायचा. यामुळे चंदनला अपमानित वाटायचे. विलासने चंदनला न सांगता आईच्या नावावर असलेली मालमत्ता विकली आणि चंदनला त्याचा हिस्साही दिला नाही. यामुळे चंदन संतापला होता. 
विलाससोबत त्यांचे अनेकदा वाद होऊ लागले. त्यातूनच त्याने विलासची हत्या करण्याचे ठरवले. ८ जून २०२३ रोजी रात्री चंदन त्याचा साथीदार मनोहरसोबत सुरादेवीला पोहोचला. नियोजनानुसार दोघांनी विलासचा धारदार शस्त्राने खून करून मृतदेह लपवून ठेवला. शौचालयाचा खड्डा खोदण्याच्या बहाण्याने चंदनने जेसीबी मागवला. तसेच मृतदेह दफन करण्यासाठी पाच किलो मीठ विकत घेतले. मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून रात्रीच दफन करण्यात आला. विलासच्या परिसरात बाहेरील लोकांची ये-जा नसल्याने घटनेबाबत कुणालाच शंका आली नाही. विलास हा पत्नीवरही अत्याचार करायचा. त्यामुळे सन २०१७ मध्ये त्याची पत्नी मुलगा व मुलीसह भावाकडे रहायला गेली. 
संवादाअभावी त्यांनाही विलासच्या खुनाची माहिती मिळू शकली नाही. विलास अचानक बेपत्ता झाल्याने गेल्या काही दिवसांपासून त्याच्याशी संबंधित लोकांनी चंदनला विचारायला सुरुवात केली होती. चंदनचे वागणे आणि उत्तरे ऐकून लोकांचा संशय बळावला. त्यांनी परिमंडळ पाचचे उपायुक्त निकेतन कदम यांच्या पथकाला ही माहिती दिली. एसीपी संतोष खांडेकर यांनी चंदनला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली. कसून चौकशी केली असता त्याने मनोहरच्या मदतीने विलासची हत्या केल्याची कबुली दिली.

खड्ड्यात विलासच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर चंदनने विटा बनवण्याच्या नावाखाली राखेचे दोन ट्रक मागवले. मृतदेह दफन केलेल्या जागेत ती राख ठेवली. बुधवारी पोलिसांनी सर्वप्रथम राख दूर केली. गुरुवारी दुपारी तहसीलदारांच्या उपस्थितीत विलासचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनानंतर हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास कोराडी पोलीस स्टेशनचे प्रभारी करीत आहे.