श्रीराम मंदिराच्या अक्षता कलश यात्रेचे कन्हाळगाव येथे मोठ्या आनंद उत्साहात स्वागत करतान्यात आले

55
श्रीराम मंदिराच्या अक्षता कलश यात्रेचे कन्हाळगाव येथे मोठ्या आनंद उत्साहात स्वागत करतान्यात आले

श्रीराम मंदिराच्या अक्षता कलश यात्रेचे कन्हाळगाव येथे मोठ्या आनंद उत्साहात स्वागत करतान्यात आले

श्रीराम मंदिराच्या अक्षता कलश यात्रेचे कन्हाळगाव येथे मोठ्या आनंद उत्साहात स्वागत करतान्यात आले

✍️मनोज आर गोरे
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण पत्रकार मो. 9923358970

कोरपना :- अयोध्या येथील श्रीराम मंदिर उत्साहाच्या अक्षता कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष नंदकिशोर गज्जलवार श्री राम सेवा समिती सदस्य प्रमुख पाहुणे दामोदर पा मालेकर माझी सरपंच, भाजपा कोरपना, विनोद पा नवले उपसरपंच, श्रीकृष्ण पडोळे सर, मनोहर बावणे तंटामुक्त अध्यक्ष,नारायण हिवृकर माजी सरपच सुरेश गारघाटे, सतिशभाऊ गज्जलवार समाजसेवक,सुधीर मालेकर,हरिभाऊ मालेकर,पंकज दुर्वे, प्रकाश डाहुले, अंकुश भोयर,सुरज भोयर, संजय नांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते सर्व प्रथम श्री हनुमान मंदीरात अक्षता कलशाची पुजा अर्चना करून सर्व ग्रामस्थांनी दर्शन घेतले व भजना द्वारे गावात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत गावातील नागरिक महिला पुरुष नवयुवक बाळ गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित राहुन श्री रामाच्या अक्षता कलशाचे दर्शन घेऊन मिरवणूक सामिल झाले नंदकिशोर गज्जलवार यांनी आपल्या मनोगतात अयोध्या येथील श्रीराम मंदिरात 22:1:2024 रोजी भगवान श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे बाविस तारखेला सर्व ग्रामस्थांनी आप आपल्या घरी अक्षताची पुजा अर्चना करून सर्वांनी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन केले श्री राम मंदिराचा प्रश्न 500 वर्षा निकाल व अयोध्या येथील राम जन्मभूमीवर भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले या उत्सवात सर्वांनी भाग घेउन हा उत्सव साजरा करावा असे आवाहन केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात तिन भारुड भजन मंडळांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच तिन्ही महिला भजन मंडळांच्या अध्यक्षांचा भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला गावातील नागरिक महिला पुरुष नवयुवक बाळ गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश डाहुले यांनी केले तर आभार सुधीर मालेकर यांनी मानले