स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंतीनिमित भव्य मिरवणूक
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवा समिती, अलिबाग ही संस्था अलिबाग मध्ये गेले ३० वर्षे कार्यरत आहे.२३ जानेवारी २०१३ रोजी स्वामी विवेकानंदांच्या जयंती (तिथीनुसार) निमित्त अलिबाग च्या प्रवेश चौकाला (बायपास) स्वामी विवेकानंद चौक असे नामकरण करण्यात आले. या कार्यक्रमात चेंढरे ग्रामपंचायत सरपंच व इतर नागरिक ही उपस्थित होते. त्याच दिवशी स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती व जोगळेकर नाका येथे भव्य कार्यक्रम सुद्धा पार पडला होता.२०१३ पासून दर वर्षी १२ जानेवारीला युवक दिनानिमित्त सेवा समितीचे कार्यकर्ते स्वामीजींना स्वामी विवेकानंद चौक येथे पुष्प अर्पण करून अभिवादन करतात. याही वर्षी १२ जानेवारी २०२५ रोजी सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वामीजींना अभिवादन केले .पण असे निदर्शनास आले आहे की स्वामी विवेकानंद चौक या फलकावर मोठमोठे बॅनर लावण्यात येतात त्यामुळे तो फलक बॅनर्स खाली झाकला जातो. तरी सर्वांना विनंती आहे की स्वामी विवेकानंद चौक या फलकावर कोणतेही बॅनर लावू नका व तसेच कोणाला लावून देऊ नका, सर्व नागरिकांना अजून एक विनंती आहे की ज्या चौकाला आपण बायपास म्हणून ओळखतो त्या चौकाला आपण स्वामी विवेकानंद चौक या नावाने संबोधावे. श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा समिती ही सामाजिक व आध्यात्मिक उपक्रम राबवत असते. नेत्र चिकित्सा शिबिर, युवकांचे संस्कार वर्ग, दिवाळी फराळ वाटप, आरोग्य दवाखाना , गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत, अध्यात्मिक शिबिर, व्याख्यानमाला, युवक संमेलन असे विविध उपक्रम सेवा समिती राबवत असते. युवक दिनानिमित्त सेवा समितीचे अध्यक्ष दंत चिकित्सक डॉक्टर अनिल पटवर्धन ,उपाध्यक्ष भालचंद्र देशपांडे व सचिव अजिंक्य शिंत्रे यांनी ही माहिती दिली.