सर्वोत्कृष्ट पोझरचा किताब आशिष बिरियाच्या नावावर
📍 जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन संपन्न
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 12 जानेवारी
श्री साई दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने भानापेठ वॉर्ड चंद्रपूर येथे “भानापेठ श्री” जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन राहुल चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या स्पर्धेत अनेक उत्साही स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन केले.
आकाश दडमलने “भानापेठ श्री” हा किताब जिंकला. राज अटकपुरवार यांनी सर्वोत्कृष्ट सुधारणाचा किताब जिंकला. “बेस्ट पोझर” हा सर्वाधिक चर्चेत असलेला किताब
आशिष बिरिया यांच्या नावावर झाला.
चंद्रपूर जिल्हा शरीरसौष्ठव आणि क्रीडा फिटनेस असोसिएशनचा पंचांचा निर्णय सर्वांनी आनंदाने स्वीकारला. दिलीप सेंगारप, नरेंद्र भुते, दिलीप करकडे, चंद्रशेखर वनकर, पन्नालाल बहुरिया, अब्दुल साजिद यांनी पंचांची भूमिका साकारली. स्टेज मार्शल म्हणून अनिरुद्ध तपासे, सोनू पिंपळकर होते.