हिंगणघाट येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी.
प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी
हिंगणघाट:- दिनांक 11/ 2/ 2019 रोजी दुपारी 12:30 वाजता आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या कार्यालयात भारतीय जनसंघाचे अध्यक्ष पंडित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त निधी समर्पण कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम ज्येष्ठ नगरसेवक रमेशजी धारकर व भाजपा वर्धा जिल्हा सचिव सुभाषजी कुंटेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये सुभाषजी कुंटेवार वर्धा जिल्हा सचिव भाजपा यांनी मार्गदर्शन केले. तसेच ज्येष्ठ नगरसेवक रमेशजी धारकर सर यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन बिस्मिल्ला खान वर्धा जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा यांनी केले. या कार्यक्रमाला शहर सरचिटणीस अनिल गहेरवार, अंकित ढगे, सह सचिव बबलू खेनवार,शहर कोषाध्यक्ष गणेश उगे तसेच नगरसेवक नरेश इवनाते, नगरसेविका सौ. रवीलाताई आखाडे,सौ. वैशालीताई सुरकार, सौ. निताताई धोबे, सौ. वंदनाताई कामडी, हसन अली अजानी सरचिटणीस अ.मो., शक्ती केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर भागवते, दत्ताभाऊ जांभुळे, प्रवीण वरटकर, मारोती साठे, शरदजी गौळकर, प्रतीक कुंभारे, केशव उमाटे, सचिन खेरकर, कार्यक्रमाला हजर होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सरचिटणीस अंकित ढगे यांनी केले.