नागपुर ब्रॅण्डेड तेलाच्या नावाखाली भेसळयुक्त तेलाची विक्री.

53

नागपुर ब्रॅण्डेड तेलाच्या नावाखाली भेसळयुक्त तेलाची विक्री.

अन्न व औषध विभागानं नागपुरच्या इतवारी परिसरातील काही दुकान व्यावसिकांकडे छापा मारल्यानंतर 3 लाख 72 हजारांचे किंमतीचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त केले आहे.

Sale of adulterated oil under the name of Nagpur branded oil.
Sale of adulterated oil under the name of Nagpur branded oil.

युवराज मेश्राम प्रतिनिधी

नागपूर: आज पैसे कमवीण्याकरिता भेसळ माफिया कुठल्याही थराला जात असल्याचे दिसून येत आहे. अशाच एक प्रकार नागपूरातील इतवारी परीसरातुन समोर आला आहे. मोठ्या कंपनीच्या ब्रॅण्डेड तेलाच्या डब्ब्यात भेसळयुक्त तेल विकत असल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. अन्न व औषध विभागानं इतवारी परिसरातील काही व्यावसिकांकडे छापा मारल्यानंतर 3 लाख 72 हजारांचे किंमतीचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त केले आहे.

एफडीए ने धाड टाकली त्या ठिकाणी नावाजलेल्या कंपन्यांचे लेबल-लागलेल्या डब्यांमध्ये भेसळयुक्त तेल भरले जात होते आणि तेच नावाजलेल्या कंपन्यांच्या नावाने बाजारात विकले जाते होते. इतवारी येथील गुरुदेव ट्रेडिंग कंपनी, लक्ष्मी ऑइल, साहील कुमार टी कंपनी, जगदीश ट्रेडिंग कंपनी, साईनाथ ट्रेडर्स या व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानावर ही कारवाई करण्यात आली आहे.

ब्रॅण्डेड खाद्यतेलाची भेसळ करून हे खाद्यतेल रि – पॅकिंग आणि विक्रीच्या आरोपाखाली जप्त करण्यात आलेल्या तेलाचे आठ नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचे अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे. मात्र या कारवाईमुळं खाद्यतेल भेसळ करणारे व्यापारी लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचं समोर आले आहे.