The municipal office in the city of Warud was locked.
The municipal office in the city of Warud was locked.

वरुड शहरातील नगरपालिका कार्यालयाला ठोकले कुलूप.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महात्मा फुले चौकात नियोजित जागेवर बसविण्याची मागणी बेदखल केल्याने संतापलेल्या नगरसेवकाने गुरूवारी पालिका कार्यालयालाच कुलूप ठोकले.

 The municipal office in the city of Warud was locked.

अमरावती:- जिल्हातील वरूड शहरातील नगरपालिका कार्यालयाला नगरसेवक आणी नागरीकांनी कुलूप ठोकल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महात्मा फुले चौकात नियोजित जागेवर बसविण्याच्या मागणीकरिता गुरूवारी काँग्रेसच्या वतीने नगरपालिका कार्यालयास कुलूप ठोकण्यात आले. नगरसेवक धनंजय बोकडे यांनी दहा दिवस आधी नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले होते. महात्मा फुले चौकात छत्रपती शिवरायांचा नियोजित पुतळा त्वरित बसवा, अशी त्या मागणी होती. दोन वर्षापासून सर्व शासकीय सोपस्कार पार पाडून सुद्धा फक्त येत्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला राजकीय लाभ मिळवून देण्यासाठी छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्यासाठी मुद्दाम उशीर केला जात असल्याचा आरोप बोकडे यांनी केला आहे.
त्याचप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेचे अंतिम हफ्ते अजूनही लाभार्थ्यापर्यंत पोहचले नाही. त्यामुळे गुरूवारी नगरपालिकेच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी व झोपलेल्या सत्ताधारी गटाला जागे करण्यासाठी नगरपालिका कार्यालयास कुलूप ठोको आंदोलन करण्यात आले. नगरपालिका कार्यालयास कुलूप ठोकल्याने नगरसेवक धनंजय बोकडे यांना अटक करण्यात आली असून त्यानंतर सुटका सुद्धा करण्यात आली. आंदोलनात नगरसेवक धनंजय बोकडे यांच्या समवेत वरुड शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी रडके, महिला काँग्रेस अध्यक्ष सविता काळे, चेतन देवते, महिला अध्यक्षा कोमल पांडव, शैलजा वानखडे, सतीश धोटे, वसंत निकम, गोपाल सोरगे, शैलेश ठाकरे, कार्तिक चौधरी, अनुराग देशमुख, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष मकसूद पठान, बंटी काजी, हेमंत कोल्हे, विकास पांडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ठाणेदार प्रदीप चौगावकर यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here