भारतीय संविधान व स्त्री पुरुष समानता याविषयावर मार्गदर्शन व चर्चासत्र संपन्न.
कष्टकरी जन आंदोलन संघटना नागपुर तर्फे महिला अधिकार, जल, जंगल, जमीन, खनिज, रोजगार यावर चर्चासत्र

✒ प्रशांत जगताप, कार्यकारी संपादक ✒
📱9766445348
नागपुर:- विदर्भ मोलकरीण संघटना या संस्थेअंतर्गत भारतीय संविधान व स्त्री-पुरुष समानता या विषयावर चर्चासत्र नुसतेच संपन्न झाले. या सत्राचे मार्गदर्शक म्हणून जननी श्रीधरन ताई व प्राध्यापक निशांत माटे सर (समाजकार्य महाविद्यालय, कामठी नागपूर) हे होते व अध्यक्ष म्हणून सुजाता भोंगाळे मॅडम या होत्या.
या चर्चासत्राची सुरुवाती ही परिचय व स्वागत करून झाली व चर्चासत्राला सुरुवात होण्याआधी काही सदस्यांनी गीते सादर केली यामुळे एक उत्साहपूर्ण वातावरण तयार झाले व चर्चासत्राला सुरुवात झाली. विलास भोंगाडे सरांनी भारतीय संविधान व स्त्री-पुरुष समानता यांची पार्श्वभूमी सांगितली व त्यानंतर असित ढवळे यांनी कायद्याअंतर्गत असलेले कलम व अनुच्छेद यांची माहिती दिली. त्यामध्ये
1) स्त्री पुरुष यांना संविधानाने प्रत्येक ठिकाणी समान अधिकार दिले.
2)नोकरी, शिक्षण, आवडी या ठिकाणी पण समान वाटा आहे. 3)प्रत्येकाला त्यांचे मूलभूत अधिकार व समानतेची वागणूक मिळावी.
4)पंचायत समिती, नगर परिषद व इतरही राजकीय पक्षात महिलांना मतदानाचा अधिकार बहाल केला.
5) स्त्रियांचे अश्लील प्रकारे प्रदर्शन करणे यावर बंदी केली. सती प्रथा कायदा, हुंडाबळी कायदा, बाल विवाह प्रतिबंधक कायदा, घरेलू हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारे अत्याचार इत्यादी घटनेवर आळा बसावा याकरिता कायदे तयार केले.
6) आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारा व्यक्ती किंवा आत्महत्या करण्यास भाग पाडले अशा सर्व घटनेवर ती कायदे करून त्यावर बंदी आणण्यात आली, हे सर्व कायदे बनवण्या मागील उद्देश की स्त्रियांचे संरक्षण व्हावे याकरिता बनवली होती परंतु ही सर्व कायदे अमलात आणले जात नाही, आज पण अशा घटना होताना आपण बघत आहोत.
स्त्रियांवर असे बिंबवले जाते की ती पुरुषांवर अवलंबून आहे व ती स्त्री खूप भावनिक असते त्यामुळे ती प्रतिनिधित्व करू शकत नाही, यासाठी आपण मीडिया व आजची चित्रपट सुष्टी याला सुद्धा दोषी ठरवु शकतो, करण आज पण टीव्हीवर ज्या काही मालिका येतात त्यामध्ये सुद्धा एका स्त्री वर दुसरी स्त्रीच अत्याचार करताना पाहतो आहे. महाभारत, रामायण व मनुस्मृती या माध्यमातून अंधश्रद्धा ही पसरवली जाते व यामुळे स्त्रियांवर अत्याचार आणखी वाढत आहे.
आज पर्यंत आपण समस्या यावर चर्चा करत आहोत पण कोणी या सर्व गोष्टीला आळा कसा बसेल याचा विचार करत नाही. महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे तुम्ही आज सक्षम आहात असे बरेच लोक बोलतात परंतु जेव्हा अशा महिला सामोरे जातात त्यांना त्यांची कुटुंब किंवा समाज देखील पाठिंबा करत नाही .
जननी श्रीधरन ताई या वेळी म्हणाल्या, जेव्हा स्त्री आवाज उठवते तेव्हा समाज हा तिलाच दोषी ठरवतो, समस्येवर लढण्या आधी स्त्रीला प्रथम स्वतःशी लढावे लागते मग कुटुंबांशीव त्यानंतर ती ची लढाई त्या समस्येशी होत असते. आज पण आपण पाहतो की स्त्रियांवर बलात्कार/अत्याचार होत आहे हे तिच्या घरी चार भिंतीच्या आत होते, जे ती कोणाला सांगू पण शकत नाही जर तिने पतीबद्दल लोकांना सांगितले त्यावर स्त्रीलाच जबाबदार ठरवल्या जाते. उदा. राजस्थान येथील घटना गेल्या पंधरा वर्षापासून तिच्यावर बलात्कार/अत्याचार होतो आहे परंतु त्या घटनेला समाज एक दारू पिणारी महिला म्हणून बघते आहे त्यावर कोणी रिपोर्ट पण बनवत नाही.
घरात होणाऱ्या हिंसाचाराची तक्रार जर ती करायला गेली तर पोलीस पण ती तक्रार घेत नाही हा तुमचा घरगुती विषय आहे तुम्हीच सोडवा असे म्हणून पोलीस सुद्धा आपले कर्तव्य बरोबर बजावत नाही, अशा वेळेस स्त्रियांनी जावे तरी कुठे हा खूप मोठा प्रश्न आहे.
प्राध्यापक निशांत माटे सर म्हणाले आपण कुठे राहतो व कोणत्या समाज रचनेत वाढलो त्याची असलेली रचना यावर अवलंबून काही प्रश्नही असतात जसे की सरकारच्या निर्णयाप्रमाणे मुलींचे लग्नाकरिता चे वय 21 वर्ष केले आहे हा निर्णय काही प्रमाणात खूप चांगला आहे परंतु 21 वर्ष म्हटलं तर त्या मुलीचं ग्रॅज्युएशन होते असते आणि ग्रॅज्युएशन झाल्यावर लग्न करणं हे पण जरा ठीक नाही केवळ 21 वर्ष झाले म्हणून लग्न करावे असे न करता त्या मुलीला तिच्या पायावर उभे होऊ द्या मग ती स्वतः ठरविला लग्न केव्हा करायचं.
आपण ज्या स्त्रियांना कमजोर समजतो खरं पाहता त्या मुळात कमजोर नाही तर त्यांची शारीरिक रचना जरी भिन्न असली तरी ती स्त्री-पुरुष हे समान आहे ती केवळ काही काळासाठी पुरुषांवर अवलंबून असते याचा अर्थ असा नाही की ती नेहमीकरिता परावलंबी आहे. काहि वर्षा आधी नागपूर येथील एका वस्तीमध्ये एक गुंडा प्रत्येक स्त्रीवर वाईट नजरेने बघतो व त्याने वस्तीतील 75 महिलांवर बलात्कार/अत्याचार केला होता, काही महिलेने यावर जेव्हा आवाज उठवला तेव्हा त्यांना शासनाकडून सुद्धा मदत झाली नाही किंवा कुठल्या नेत्याची ही मदत मिळाली नाही व कालांतराने त्यांच्या वर होणारे आत्त्याचार वाढू लागले व ती रोज होणारी एक घटना म्हणून सोडून दिल्या गेलं, तेव्हा काही महिलांच्या पुढाकाराने वस्तीतील सर्व महिला मिळून त्या नराधमाला कोर्टा मध्येच शिक्षा दिली व या सत्य घटनेवर आधारित एक चित्रपट सुद्धा आहे. या घटनेवरून तरी आपण महिला या कमजोर नाही असे म्हणू शकतो. खरतर महिलांना ते साबित करण्याची संधीच मिळाली नाही, झारखंड येथील महिलांच्या पुढाकाराने “वन संरक्षण कायदा” तयार केला परंतु लीडर हे पुरुष असल्याने कुठेतरी त्या स्त्रियांना डावले गेले व पुरुष हा नेता म्हणून उठून दिसु लागला. परंतु मी आज हे निश्चित सांगू शकतो की महिलांसाठी जेवढे कायदे हे अस्तित्वात आले त्यामध्ये महिलांचा सिंहाचा वाटा आहे.
घटस्फोट कायदा व बहुपत्नी विवाह यावर ती जेव्हा कायदे महिलांचा सहभाग होता.
1)कायद्याला प्रत्यक्षात अमलात आणण्याचे काम आपण आपल्या घरूनच केले पाहिजे.
2) मुलींना निर्बंध लावण्यापेक्षा मुलांना पण त्याचे कर्तव्य व जबाबदारीचे भान करून दिले पाहिजे.
3)स्री जर कोणत्या समस्येवर लढत असेल तर तिला सपोर्ट केला पाहिजे.
4) समानता जर आणायची असेल तर ती केवळ संविधानामुळेच येऊ शकते.
5) मनुस्मृति चे परिणाम आज पण आपल्या जीवनावर होत दिसत आहे.
6) संविधानाने जे हक्क अधिकार दिले ते स्त्री-पुरुष समजून नाही तर एक व्यक्ती म्हणून दिलेले अधिका आहे.
7)स्त्री-पुरुष समानता म्हणताना आपण थर्ड जेंडर यांना विसरून चालणार नाही. स्त्री-पुरुष नाहीतर तृतीयपंथी हे देखील या समाज जीवनाचे महत्त्वपूर्ण असे घटक आहे. समाजात राहात असताना आता पण या लोकांना त्यांची लढाई ही स्वतःबरोबर व समाजा बरोबर लढावी लागते. आपल्याला हे विसरून चालणार नाही की तेसुद्धा या स्वतंत्र भारताचे स्वतंत्र असे नागरिक आहे व त्यांची पण एक अभिव्यक्ती ही बनलेली आहे.
या मीटिंगला जास्तीत जास्त स्त्रिया उपस्थित होत्या. त्यांनी स्वतःचे किंवा जवळच्या परिस्थितीचे निरीक्षण करून आपले मत मांडली आहे. काही गोष्टीवर मतभेद देखील होत होती पण जेव्हा त्यांची पूर्ण गोष्ट व विचार ऐकले तेव्हा त्यांचे बोलणे इतरांना पण पडले. आपण बघतो की स्त्री या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करते, स्त्रिया या पुरुषांप्रमाणेच आपल्या परिवाराचे नाव लौकिक करण्याच्या प्रयत्नात नेहमीच तत्पर असतात परंतु जेव्हा त्यांच्या कौटुंबिक स्थिती पाहाली जाते तेव्हा इथे मात्र भिन्नता पाहायला मिळते. बाहेरजी स्त्री जबाबदार व कर्तुत्ववान अशी भूमिका बजावणारी असते तीच स्त्री घरात मात्र परावलंबी व निर्णयक्षमता नसणारे बघायला मिळते. स्त्रियांना आजही भोगवस्तू म्हणून बघितले जाते, आज पण संबंध ठेवताना आपले ठाम मत ती मांडू शकत नाही किंवा ते विचारात पण घेतल्या जात नाही. इथूनच त्या स्त्रियांच्या मतांचे हनन होत जाते व याची साधी दखल पण कोणी घेत नाही. या मीटिंग मधून मला सर्व स्त्रियांना एवढेच सांगायचे आहे की
हरवू नको स्वतःला या गर्दीत.
सांगून टाक्या जगाला तुझी मन मर्जी.
उफाळून येतील तुझे शब्द ओठी.
वाट दाव त्याही प्रसंगाला मन मोकळी.
अशाप्रकारे ही मीटिंग संपन्न झाली व यात सर्वच सदस्यांचा सहभाग होता एकूण 26 सदस्यांना उपस्थित होती. आलेल्या प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्षांचे आभार मानून आजची ही बैठक थांबविली.