“माझीया माहेरा”

42
"माझीया माहेरा"
"माझीया माहेरा"

“माझीया माहेरा”

"माझीया माहेरा"
“माझीया माहेरा”

लेखिका :- मयुरी कुनाल टेंभरे

माहेर म्हणजे लग्न झालेल्या मुलीच्या आई वडिलांच घर. जे तिचा सासरहुन भिन्न असते. ‘माहेर’ या शब्दातच खुप जिव्हाळा, प्रेम, काळजी, आपुलकी दिसते आणि त्याची कमी सासरी गेल्यावर कळते. मात्र हे खर, कारण माहेरचे लोक नेहमी कोणतेही आव्हान, अडचनीला सामना करायला तटस्थ असतात. मायच माहेर आणि सुखाच सासर असन सर्व मुलीचं स्वप्न असते. लग्ना अगोदर मुली खुप आनंदी, मनमोकळे असतात, घरच्यानी जरी तिला म्हटलं आता तु मोठी झाली तुझ लग्न करुन दयाव लागेल तेव्हा नक्की सगळ्याच मुलीचं आपल्या आई-वडीलानां हेच उत्तर असणार मी लग्न करणार नाहीं? मी का बर करु? मी तुम्हा सर्वाना सोडून कुठे जाणार नाही. इथेच राहनार तुमच्या सोबत, आपल्या घरी, हे जितक बोलण्यात सोफ असते तितकच ते जिवन जगण्यात कठिन असते.

मुलगी जन्माला आल्या पासुन तर मोठे होत पर्यत आई-वडील तिला भरपूर लाड पुरवतात तसच भाऊ बहीन सोबत खुप मस्ती भांडन सगळं व्यवस्थित सुरु असते. तिला फुलासारख जपतात, वाढवतात, शिकवतात, मोठ करतात, आणि स्वता:चा पायावर उभं करतात. मग कुनी अनोळखी व्यक्ति येते आई- वडीलानां छान वाटल तर त्यासोबत आपल्या मुलीचं लग्न लावून देतात. खर तर ते आपल्या मुलीचं दान करतात अस म्हणायला हरकत नाही. लग्न झाल्यावर मुलीचं नाव, गांव, रुप, आडनाव, ओळख का बदलावी लागते आणि ते मुलांना ते का बर लागू होत नाही. त्याच उत्तर माझा कडे तरी नाही. आताचा युगात मुली मुलांच्या खादयाला खाद लावुन पुढे जात आहे. आज महिला गगन भरारी घेत आहे. रोज नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. तर मुलीनी माहेरच किवा सासरच आडनाव स्वता:चा इच्छेनुसार वापरता यायला हवं त्याची ओळख ज्या नावाने होती तीच असायला पाहीजे.

माहेर हे सगळ्यांच स्त्रियान साठी सारखंच असत यात उच्च-निच्च, अमिर-गरीब, जात-पात नसते. स्त्री शिक्षीत असो किवा अशिक्षित सर्वाना माहेरची ओढ असते. ते कधी बदलवू शकत नाही. काही ना तर माहेर नसते तर ते सासरला आपल माहेर समजात. मला जर माझा माहेर बद्दल सांगायचं झाल तर ते क्षन अविस्मर्णीय आहे, लहान असताना बाबा गेले त्यानंतर आईनेच आई- बाबाचे लाड, राग दोन्ही पुरवल. कुठल्याही गोष्ठीची कमी पडू दिली नाही. कुठलीही रोख-टोक नव्हती. माझी आई तशी अशिक्षीत, आईला शिक्षणाबाबत जास्त काही माहीती नव्हती. पण आईला नेहमी अस वाटत होते की, मी खुप शिक्षण घ्याव. त्यात तिने माझा वर विश्वास ठेवल जे तुला शिकायच ते शिक पैसा, घर किवा लोकांची तु विचार करु नको. फक्त तु पुढे जा अस म्हणारी माझी आई, तसेच घरात असणारे भाऊ, बहीन, काका, काकु यांनी नेहमी साथ दिली. सर्वात महत्वाच क्षण म्हणजे माझी आई माझा सोबत पदवीधर झाली. आज आई नसतांनी माहेर असल्या नसल्या सारखच वाटते. माहेरसाठी जितक लिखान केल ते कमीच आहे. पन आज अस वाटते मला तिचा नावानी लोकांनी हाक मारावी, ओळखाव.

मायेची माहेरची लेक मी..
ओलाडुन जाते तुजा घरचा उंभराटा..
तुझा माहेरची सावली..
दारात उभी आहे ग तुझा घरची माऊली..

लेखिका:
माहेर- मयुरी सुशिला कांबले
सासर- मयुरी कुनाल टेंभरे

सर्वसामान्यांच्या समस्या, सर्व सामान्यांचे प्रश्न

सर्वसामान्यांच्या बातम्यांनाच, आम्ही देतो महत्त्व

आज आपल्या विश्वासाबरोबरच मीडिया वार्ता न्यूजला गरज आहे, आपल्या मदतीची. आपली छोटीशी मदत या फेक न्यूजच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या बातम्यांना वाचा फोडून प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लाखमोलाची ठरू शकते.