क्रिकेट हा आपल्या मातीशी जुळलेला खेळ :- धर्मरावबाबा आत्राम बामणी-ग्लाईसपेठा येथील क्रिकेट सामन्याचा समारोप

130

क्रिकेट हा आपल्या मातीशी जुळलेला खेळ :- धर्मरावबाबा आत्राम

बामणी-ग्लाईसपेठा येथील क्रिकेट सामन्याचा समारोप

क्रिकेट हा आपल्या मातीशी जुळलेला खेळ :- धर्मरावबाबा आत्राम बामणी-ग्लाईसपेठा येथील क्रिकेट सामन्याचा समारोप

रवी बारसागडी
सिरोंचा तालुका प्रतिनिधी
टेकडाताला सिरोंचा

सिरोंचा : – सिरोंचा तालुक्यातील बामणी- ग्लाईसपेठा येथील क्रिकेट सामन्याचा आज समारोप करण्यात आला प्रथम पुरस्कार येथील क्रिकेट खेळाडूंनी पटकवीला तर द्वितीय पुरस्कार यांनां तर तृतिय पुरस्कार यांनी पटकाविले यावेळी समारोपीय कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी माजी मंत्री व विध्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम हे होते तर प्रमुख अतिथी मदन मस्के, प्रभारी पोलीस अधिकारी उपपोलीस स्टेशन बामणी,रामकिष्टू निलम,राष्ट्रवादी कांग्रेस उपाध्यक्ष, व ईतर मान्यवर उपस्थित होते

पूर्वी शरीराला व्यायाम होईल असे कबड्डी, कुस्त्या, चेंडू, लघोरी, सूर-पारंब्या खेळल्या जायच्या. टाळ-मृदंगाच्या, ढोल-लेझीमच्या तालावर नाचायचे. यामुळे चांगला व्यायाम होऊन मन प्रसन्न असायचे. समाधान वाटायचे. या निमित्ताने गावकऱ्यांची एकजूट व्हायची. आता अशा खेळाचे प्रमाण कमी झाल्याने, तरुण पिढी आजार, व्यसनाकडे झुकत आहे. रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, टीव्ही, मोबाईलमुळे शारीरिक व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून असे पारंपरिक खेळ चालू राहिले पाहिजेत.
क्रिकेट हा आपल्या मातीशी जोडलेला खेळ असुन यातुन आपल्याला उत्तम खेळाडू मिळत असतात त्यामुळे या खेळाकडे केवळ एक मनोरंजनाचा खेळ म्हनून न बघता या खेळाच्या माध्यमातून आपले भविष्य घडवावे असे समारोप प्रसंगी ‌ आमदार धर्मरावबाबा आत्राम बोलत होते