सावली (वाघ) ग्रामपंचायतीचे नागरिकांच्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष… गावकऱ्यांनी निवेदने सादर करूनही मागणी पूर्ण होत नसल्याची माहिती.

59

सावली (वाघ) ग्रामपंचायतीचे नागरिकांच्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष…

गावकऱ्यांनी निवेदने सादर करूनही मागणी पूर्ण होत नसल्याची माहिती.

सावली (वाघ) ग्रामपंचायतीचे नागरिकांच्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष... गावकऱ्यांनी निवेदने सादर करूनही मागणी पूर्ण होत नसल्याची माहिती.

✒ करण विटाळे✒
हिंगणघाट ग्रामीण तालुका
प्रतिनिधी :- 8806839078

हिंगणघाट : तालुक्यामध्ये येत असलेल्या सावली (वाघ) येथील ग्रामपंचायत प्रशासनाचेप्रशासनाचे गावातील नागरिकांच्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. सावली (वाघ) ते सेलू या भागात मोठ्या प्रमाणात गिट्टीखदान असुन तेथील संपूर्ण अवजड वाहतूक सावली या गावातील मुख्य रस्त्यावरुन होत असते रस्ता अरुंद असल्याने या अवजड वाहतूकिचा गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.खदानिवरील ट्रक् मुळे आजवर कित्येक शेतकऱ्यांच्या जनावरांचा अपघात होऊन अनेक जनावरे दगावले आहे. गावाबाहेर शाळा असल्याने शेकडो विद्यार्थी सुद्धा याच रस्त्यावरुन ये जा करतात त्यामुळे अवजड वाहतूकिचा विद्यार्थ्यांनाही बसतो. त्यामुळे गावातील काही नागरिकांनी गावातील अवजड वाहनं बंद करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने कुठलाही तोडगा न काढता याकडे पाठ फिरवीत दुर्लक्ष केले आहे. यातुन असे दिसून येते की गावातील ग्रामपंचायत प्रशासनानामधे ईथे कुठेतरी एक मोठी पोकळी निर्माण झाली असून अधिकाऱ्यांना आर्थिक बजेट मिळत असावे. अशी माहिती गावकऱ्यांकडून मिळाली आहे.